घरमहाराष्ट्रमिंधे, बाजारबुणगे, भंपक, धोकेबाज, ढोंगीबाज; ठाकरे गटाकडून महायुतीवर वाग्-बाण

मिंधे, बाजारबुणगे, भंपक, धोकेबाज, ढोंगीबाज; ठाकरे गटाकडून महायुतीवर वाग्-बाण

Subscribe

Samana Editorial on Mahayuti | विविध खोचक शब्दांचा वापर करून आज ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात वाग्-बाण सोडत शिंदे गट आणि भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे.

Samana Editorial on Mahayuti | मुंबई – केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्ह शिंदे गटाला बहाल केले आहे. यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. आधी ४० आमदार, १३ खासदार गेल्यानंतर आता संपूर्ण पक्षच शिंदेंच्या ताब्यात गेल्याने उद्धव ठाकरेंसह ठाकरे गटातील अनेक निष्ठावंत नेते पेटून उठले आहेत. त्यातच, त्यांनी शिंदे गट आणि भाजपावर निशाणा साधायला सुरुवात केली आहे. विविध खोचक शब्दांचा वापर करून आज ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या शिवसेनेच्या अग्रलेखातून वाग्-बाण सोडत शिंदे गट आणि भाजपावर टीकास्त्र सोडलं आहे.

तळवे चाटणाऱ्या मिंध्यांना मुख्यमंत्री केले

- Advertisement -

निवडणूक आयोगाने ‘शिवसेना’ हे नाव आणि निवडणूक चिन्हाबाबतचा निकाल मिंध्यांच्या बाजूने दिला तरी शिवसेना ही ठाकऱ्यांचीच होती, आहे व राहील . महाराष्ट्रात किमान दोन हजार कोटींचा सौदा करून आधी सरकार विकत घेतले व आता धनुष्यबाणाचा , शिवसेना नावाचा सौदा करण्यात आला . ही कसली लोकशाही ? मोदी युग संपले आणि बाळासाहेब ठाकरे व त्यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेशिवाय महाराष्ट्रात भाजपला कुत्रेही विचारणार नसल्यानेच त्यांनी शिवसेनेवर दरोडा टाकला व आपले तळवे चाटणाऱ्या मिंध्यांना मुख्यमंत्री केले, असा टोला या अग्रलेखातून लगावण्यात आला आहे.

बाजारबुणग्यांच्या भरवशावर पक्षाचे भविष्य ठरवले

- Advertisement -

40 बेइमान आमदार, 12 खासदार म्हणजे शिवसेना, असा निकाल देऊन लोकभावना व कायद्याचे धिंडवडे काढले गेले. मग लाखो शिवसैनिकांनी दिल्लीतील निवडणूक आयोगाच्या पुढ्यात त्यांची प्रतिज्ञापत्रे ‘ट्रक’ भरून पाठवली, त्यांना किंमत नाही? शिवसेनेचे पदाधिकारी, जिल्हाप्रमुख, उपनेते यांच्या प्रतिज्ञापत्रांना मोल नाही? शिवसैनिकांनी ज्यांना निवडून आणले त्यांची डोकी मोजून धनुष्यबाण व पक्षाच्या स्वामित्वाचा निकाल देणे ही घटनेशीच बेइमानी आहे. ठाकऱ्यांच्या नावावर त्यांना मते मिळाली. उद्याही ती मिळतीलच व पुन्हा हे लोक निवडून येतीलच अशी खात्री नसताना त्या बाजारबुणग्यांच्या भरवशावर शिवसेना व धनुष्यबाणाचे भविष्य ठरवण्यात आले, असा हल्लाबोलही यावेळी करण्यात आला.

भपंक विधानं करून मांडीस मांडी घालून बसले

सत्तेचा आज एवढा बेगुमान गैरवापर इतिहासात याआधी कधीच झाला नव्हता. आता गृहमंत्री अमित शहा पुण्यात येऊन सांगतात, ”धोका देणाऱ्यांना कधी सोडायचे नसते!” हे भंपक विधान ते एक नंबरच्या धोकेबाजांच्या मांडीस मांडी लावून करीत आहेत. मोदींच्या नावाने मते मागितली, मात्र मुख्यमंत्री होण्यासाठी विरोधकांचे तळवे चाटले, असे दिव्य विचार त्यांनी मांडले. असे बोलणारे स्वतःच्या ढोंगबाजीवरच शिक्कामोर्तब करीत आहेत, असं म्हणत शिंदे गटाचा समाचार घेण्यात आला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -