उद्घाटनापासून चर्चेत असलेल्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाबाबत (Nagpur Mumbai Samruddhi Highway)एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. समृद्धी महामार्ग सुरू झाल्यापासून 31 जुलैपर्यंत म्हणजे गेल्या साडेसात महिन्यात तब्बल 729 अपघात झाले आहेत. या अपघातामध्ये आतापर्यंत 101 जणांचा मृत्यू झाला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे यापैकी 53 जणांचा मृत्यू हा रात्री 12 ते सकाळी 6 दरम्यान झालेल्या अपघातात झाला आहे. महामार्ग पोलीस अप्पर पोलीस महासंचालक रवींद्र सिंगल यांनी ही माहिती दिली आहे. (Samruddhi Mahamarg As many as 729 accidents on Samruddhi Highway so far Most deaths occur between 12 and 3 am)
डॉक्टर रवींद्र सिंगल यांनी दिलेल्या माहितीनुसार, एकूण 729 अपघातामध्ये 338 अपघातात कोणीही जखमी झालेलं नाही. तर 391 किरकोळ व गंभीर अपघातात आतापर्यंत 101 मृत्यू तर 748 जखमी झाले आहेत. परंतु चार अपघातांमध्ये 1 मृत्यू व 25 जण जखमी झाले आहेत. त्याचबरोबर गाडीचा टायर फुटल्याने 9 अपघात झाले आहेत. यामध्ये ही कोणीही जखमी झालेलं नाही. 61 अपघातात 10 जमआंचा मृत्यू झाला असून 142 लोक जखमी झाले आहेत.
अपघाताची ‘ही’ आहेत कारणं
इतकचं नव्हे तर रात्री गाडी चालवताना झोप लागल्यामुळे 242 अपघात समृद्धी महामार्गावर झाले आहेत. यातील 130 अपघातात 44 मृत्यू तर 254 जण जखमी झाले आहेत. यांत्रिकी कारणामुळे 27 अपघातात 33 मृत्यू तर 152 जण जखमी झाले. तसंच, ब्रेकडाऊनमुळे 22 अपघात झाले ज्यातील 6 अपघातांमध्ये कोणालाही दुखापत झाली नाही. यासोबतच 16 अपघातात 2 मृत्यू तर 22 जण जखमी झाल्याची माहिती डॉक्टर रवींद्र सिंगल दिली आहे.
समृद्धी महामार्गावर सातत्याने होत असलेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर समृद्धी महामार्गावरील वाहतूक तूर्त थांबवावी अशी याचिका नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेची दखल घेत न्यायालयाने राज्य सरकार आणि एमएसआरडीसीला नोटीस बजावत चार आठवड्यांत उत्तर देण्यास सांगितलं आहे.
(हेही वाचा: धक्कादायक : दलित तरुणांना चोरीच्या संशयातून घरातून उचललं, झाडाला उलटं लटकवून बेदम मारहाण )