घरमहाराष्ट्र'समृद्धी' श्रीमंतांसाठी?, मुंबई-नागपूर प्रवासासाठी भरावा लागणार १ हजार १५७ रुपयांचा टोल

‘समृद्धी’ श्रीमंतांसाठी?, मुंबई-नागपूर प्रवासासाठी भरावा लागणार १ हजार १५७ रुपयांचा टोल

Subscribe

राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या समृद्धी महामार्गावरुन प्रवास करणं सामान्यांना परवडणार का? याबाबतची साशंकता आहे. कारण समृद्धीच्या महामार्गावर एका बाजूच्या टोलसाठी तब्बल १ हजार १५७ रुपये आकारले जाणार आहेत. त्यामुळे रेल्वेच्या थर्ड लेव्हल एवढा टोल कोण देणार? असा सवाल आता विचारला जात आहे.

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग प्रकल्पातील नागपूर ते शिर्डी हा ५२० किमी लांबीचा मार्ग डिसेंबर २०२१ पासून वाहतुकीसाठी उपलब्ध होणार आहे. तर पुढील वर्षी २०२२ मध्ये ७०० किमीचा संपूर्ण मार्ग वाहतुकीस खुला होणार आहे. मात्र या मार्गाचा वापर करण्यासाठी वाहनचालक आणि प्रवाशांना टोलपोटी १ रुपया ६५ पैसे प्रति किमी दराने शुल्क भरावे लागणार आहे. त्यामुळे मुंबई ते नागपूर एकेरी प्रवास करायचा असेल तर १,१५७ रुपये मोजावे लागणार आहेत.

- Advertisement -

समृद्धी महामार्गावरुन प्रवास करण्यासाठी किती टोल द्यावा लागेल, हा प्रश्न उपस्थित केला जात होता. अखेर ‘महाराष्ट्र राज्य रस्ते विकास प्राधिकरणा’ने टोलचे दर जाहीर केले आहेत. समृद्धी महामार्गासाठी केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार १ रुपया ६५ पैसे प्रति किमी दराने टोल आकारणी केली जाणार असल्याची माहिती ‘एमएसआरडीसी’चे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी दिली.

‘समृद्धी’ श्रीमंतांसाठी?

मुंबई-नागपूर ७०० किलोमीटर प्रवासासाठी ११५७ रुपयांचा टोल आकारला जाणार आहे.
रेल्वेच्या सेकंड स्लीपर कोचचं भाडं ५०० रुपये आहे.
विमानाचं तिकीट ३५०० ते ४००० हजार रुपये आहे.
टोल आणि कारच्या इंधनाची गोळाबेरीज केल्यास विमानाचा प्रवास स्वस्त ठरतोय.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -