समृद्धी महामार्ग गेमचेंजर ठरेल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास

eknath shinde

केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडून 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त केंद्रानं सुरु केलेल्या आझादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमातील ‘संकल्प से सिद्धी’ परिषद मुंबईतल्या ताज पॅलेसमध्ये पार पडली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समृद्धी महामार्गाचा एक टप्पा लवकरच सुरू करणार आहे. हा महामार्ग गेमचेंजर ठरेल. यामुळे शेतकरी आत्महत्या थांबतील, असा विश्वास व्यक्त केला. या परिषदेला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय राज्यमंत्री मिनाक्षी लेखी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीचे पदाधिकारी उपस्थित होते.

नितीन गडकरींचे कौतुक –

सुरवातीच्या काळात एका दिवसात 12 किलोमीटर प्रतिदिवस रोड बनवले जात होते. पण गडकरी साहेबांच्या काळात 36 किलोमीटर रोड बनवले जात आहेत. आपल्या राज्याकडे त्यांचे लक्ष आह. आपल्याला सीआरएफ, नॅशनल हायवे आणि सार्वजनीक बांधकाम विभागाला त्यांनी फंड दिला आहे. या पुढे जादा फंड द्यावा लागेल. आमच्या सरकार कडून लोकांच्या आपेक्षा वाढल्या आहेत. आम्ही सरकार स्थापन कल्यामुळे सामान्य जनतेच्या आपेक्षा वाढल्या आहेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

व्हॅट कमी करण्याचा प्रयत्न  –

मुख्यमंत्री म्हणाले की,  गडकरींचे देखील राज्यावर लक्ष आहे, आता निधी जास्त द्यावा लागेल. लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. सामान्य माणसाच्या अपेक्षा वाढल्या आहेत, असं मुख्यमंत्री म्हणाले. ते म्हणाले की, शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र करणार आहे.  राज्यासाठी जेवढे करायचं करु. आमच्यासोबत केंद्राचा आशीर्वाद आहे, असं ते म्हणाले. त्यांनी म्हटलं की, महागाई खूप वाढत आहे, इथेनाॅलमुळे खर्च कमी होईल. व्हॅट कमी करण्याचा प्रयत्न करु.  शेंद्रा-बिडकीन तयार झालंय, ३ लाख रोजगार मिळणार, पंतप्रधानांनी प्रकल्प देशाला समर्पित केलाय असं त्यांनी सांगितलं.

कसा आहे समृद्धी महामार्ग मार्ग? –

नागपूर ते मुंबई हा 701 किमी लांबीचा समृद्धी महामार्ग आहे. 10 जिल्हे, 26 तालुके आणि आसपासच्या 392 गावांना हा मार्ग जोडतो. याची गती मर्यादा 150 किमी आहे. त्यामुळे नागपूर ते मुंबई हे अंतर फक्त 8 तासात कापले जाईल. मुंबई ते औरंगाबाद प्रवासाचा कालावधी 4 तास आणि औरंगाबाद ते नागपूर 4 तास वेळ लागेल, या मार्गामुळे दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडोर, वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर, वर्धा व जालना कोरडे बंदरे आणि मुंबईच्या जेएनपीटीला जोडली जातील.

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग –

भूमिपूजन – १८ डिसेंबर २०१८

पहिला टप्पा (नागपूर-शिर्डी) – डिसेंबर २०२१

प्रकल्प पूर्ण कालमर्यादा – डिसेंबर २०२२

खर्च – ५५,००० कोटी

लांबी – ७०१ किमी

प्रस्तावित टोल – १,१५७ रुपये

टोलप्लाझा – ६१

टोलमार्गिका – ३१६