घरताज्या घडामोडी२५ वर्षात चांगल्या दर्जाचा रस्ता नाही, पण नवीन मातोश्री उभी राहिली; संदीप...

२५ वर्षात चांगल्या दर्जाचा रस्ता नाही, पण नवीन मातोश्री उभी राहिली; संदीप देशपांडेंचा हल्लाबोल

Subscribe

मनसेकडून मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभमीवर ‘घे भरारी’ या अभियानांर्गत मुंबईत सभा घेण्यात आली. यावेळी मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी मुंबईतील रस्ते, मंदीचं वातावरण, पालिकेचं बजेट आणि राज्यातील राजकारणाविषयी भाष्य केलं. दरम्यान २५ वर्षात चांगल्या दर्जाचा रस्ता नाही, पण नवीन मातोश्री उभी राहिली, असं म्हणत मनसेच सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

…पण नवीन मातोश्री उभी राहिली

- Advertisement -

संदीप देशपांडे यांनी सभेला संबोधित करताना म्हटलं की, मुंबई महापालिकेचा बजेट ३६ हजार कोटी आहे. दरवर्षी आपण २२०० कोटी रुपये खर्च करतो. गेल्या ५ वर्षात आपण १५ हजार कोटी रुपये रस्त्यांसाठी खर्च केले. हे रस्ते तुम्हाला दिसताहेत का?, मग हा प्रश्न जेव्हा आपण सत्ताधाऱ्यांना विचारायला उभा राहतो आणि जर तुम्ही १५ हजार कोटी रस्त्यांसाठी खर्च केले असतील, तर आजही रस्त्यात खड्डे कशासाठी?, नवीन रस्ता तयार करणं हे रॉकेट सायन्स नाही. गेल्या २५ वर्षात एकही चांगल्या दर्जाचा रस्ता तयार झाला नाही. परंतु त्याच कालावधीत वांद्रेमध्ये नवीन मातोश्री उभी राहिली. ती सुद्धा अतिशय सुंदर उभी राहिली, असं म्हणत संदीप देशपांडे यांनी ठाकरेंवर टीका केली.

गेल्या ४ महिन्यात आपल्यापैकी कोणी आपल्या प्रश्नांवर बोलताना कोणत्या राजकारणांना पाहिलंय का?, आपले मूळ प्रश्नच हे लोकं आपल्याला विसरायला लावतात. हे फार मोठं षडयंत्र आहे. तुमच्या मूळ प्रश्नावरती तुम्हाला विचार करून द्यायचा नाही, त्याबद्दल बोलायचं नाही, चर्चाही होऊ द्यायची नाही, यामध्ये त्यांनी गुंतवून ठेवलं आहे, असं संदीप देशपांडे म्हणाले.

- Advertisement -

महापुरुषांवर बोलण्याची माझी लायकी नाही

आज सगळीकडे मंदीचं वातावरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे माझी नोकरी टीकेल की नाही हे मला माहिती नाही. नोकरी टिकली तर माझा मला पगार मिळेल की नाही, हे मला माहिती नाही. या चिंतेने सर्वसामान्य नागरीक ग्रासलेला आहे. आपण जेव्हा त्याला प्रश्न विचारतो की, धर्मरक्षक की स्वराज्यरक्षक याचं उत्तर दे?, तेव्हा सामान्य माणूस खूप विवंचनेत असतो. त्याचं उत्तर हे असेल की, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले हे एवढे महान व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांचे कार्यही अफाट आहे. त्यामुळे माझ्यासारखा सामान्य माणूस त्यांचे विश्लेषण करु शकत नाही. मी अतिशय सामान्य माणूस असल्यामुळे या सर्व महापुरुषांवर बोलण्याची माझी लायकी नाही. माझ्या समस्या फार लहान आहेत. परंतु त्याच्याबद्दल हे लोक बोलणार नाहीत, असं देशपांडे म्हणाले.

मातोश्रीला ५० लाखांचे घड्याळ दिले पण ते कोणत्या मातोश्रीला गेले?

आरोग्याचा बजेट २ हजार कोटी आहे. गेल्या पाच वर्षात आपण दहा हजार कोटी आरोग्यासाठी खर्च केले. पण तुम्हाला काय मिळालं?, त्यासाठी ना नवीन रुग्णालय बांधले, ना कोणत्या रुग्णालयाची सुधारणा केली. पण  स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी मातोश्रीला ५० लाखांचे घड्याळ दिले, ते कोणत्या मातोश्रीला गेले ते माहित नाही. आतापर्यंत मुंबईतील नागरिकांनी ४० लाख कोटींचा टॅक्स पालिकेला भरला आहे. पण आपल्याला चांगल्या सुविधा मिळतात का?, सरकारी रुग्णालयात आपल्याला चांगले उपचार हवे असतील तर चांगली ओळख लागते. येणाऱ्या पालिकेच्या निवडणुकीत मतदान करताना भावनिक होऊन मतदान करू नका, असा सल्ला देखील देशपांडे यांनी मतदारांना दिला आहे.


हेही वाचा : मोठी बातमी! महारेराकडे प्रकल्पाची नोंदणी करताना प्रमोटर्ससह सर्व संचालकांचा DIN क्रमांक आवश्यक


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -