घरताज्या घडामोडीसामनावीर यांनी जो हिशोब ईडीला द्यायचाय त्याची चिंता करावी, संदीप देशपांडेंची राऊतांवर...

सामनावीर यांनी जो हिशोब ईडीला द्यायचाय त्याची चिंता करावी, संदीप देशपांडेंची राऊतांवर टीका

Subscribe

मुंबईला केंद्रशासित प्रदेश करण्याचे भाजपचे प्रयत्न सुरू असल्याचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले होते. तसेच या कटाचे सूत्रधार भाजप नेते किरीट सोमय्या असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला होता. मात्र, या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय. यावेळी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनीही आता या वादात उडी घेतली असून सामनावीर यांनी जो हिशोब ईडीला द्यायचाय त्याची चिंता करावी, अशी टीका मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी संजय राऊत यांनी केली आहे.

संदीप देशपांडे यांनी ट्विट करत मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा भाजप कट रचतंय, असं वक्तव्य करणाऱ्या संजय राऊत यांना प्रतित्त्युर दिलं आहे. विचार भ्रमकार सामनावीर यांनी जो हिशोब “इ.डी” द्यायचाय त्याची चिंता करावी, राजसाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना असताना मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याची हिंमत कोण्याच्या बापात नाही, असं ट्विट संदीप देशपांडे यांनी केलं आहे.

- Advertisement -

काय म्हणाले होते संजय राऊत?

भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्याच्या काही लोकांचं एक फार मोठं षडयंत्र सुरू आहे. मुंबई केंद्रशासित करण्यासंदर्भात या लोकांनी केंद्रीय गृहमंत्रालयाला एक प्रेझेंटेशन दिलंय, असं म्हणत संजय राऊतांनी मोठा गौप्यस्फोट केला होता. संजय राऊतांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

- Advertisement -

ते दोन गोष्टींसाठी केंद्रात जातात. एक खोटे कागद घेऊन केंद्रात जातात. दुसरं म्हणजे या किरीट सोमय्या आणि त्याच्या काही लोकांचं एक फार मोठं षडयंत्र सुरू आहे. मुंबई केंद्रशासित करण्यासंदर्भात या लोकांनी केंद्रीय गृहमंत्रालयाला एक प्रेझेंटेशन दिलंय. मुंबईतले काही धनिक, काही धनदांडगे आणि काही भाजपचे नेते, बिल्डर्स यांच्या संगनमताने किरीट सोमय्या हा नेतृत्व करतोय. आणि मुंबई केंद्रशासित कशी करता येईल, यासंदर्भातील एक प्रेझेंटेशन भाजपच्या पाच लोकांनी मुंबईत तयार केलंय, असं संजय राऊत म्हणाले.

संदीप देशपांडेंनी केलं ट्रेलरचं ट्विट


हेही वाचा : ST Workers : पवारांच्या घरावरील हल्ला एसटी कर्मचाऱ्यांना भोवणार, नोकरीवरुन काढून टाकण्याचा परिवहनमंत्र्यांचा निर्णय


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -