घरताज्या घडामोडी...तेव्हा राज ठाकरेंनी भावाला पण सोडलं नव्हतं, मनसेचं सेनेला रोखठोक उत्तर

…तेव्हा राज ठाकरेंनी भावाला पण सोडलं नव्हतं, मनसेचं सेनेला रोखठोक उत्तर

Subscribe

वेदांता प्रकरणावरून शिवसेनेने मुखपत्र सामना अग्रलेखातून शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. तरुणांचा रोजगार हिरावून घेणारे राज ठाकरेंचे मित्र भाजपवालेच आहेत असे म्हणत मनसेप्रमुख राज ठाकरे यांना शिवसेनेने डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, मनसेने सेनेला रोखठोक उत्तर दिलं आहे.

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करत शिवसेनेवर पलटवार केला आहे. जेव्हा महाराष्ट्राच्या भल्याचा विषय येतो तेव्हा राजसाहेबांनी मित्रांनाच काय पण भावाला पण सोडलं नाही. त्यामुळे त्याची चिंता सामनानी करू नये, अशा शब्दांत संदीप देशपांडे यांनी सेनेला सडेतोड उत्तर दिले आहे.

- Advertisement -

शिवसेनेचं आजचं आंदोलन हे नाटक आहे, ज्यावेळेला मराठी मुलांच्या नोकऱ्या परप्रांतीय हिसकावत होते आणि मनसे महाराष्ट्र भर आंदोलन करत होती, राजसाहेबांना अटक झाली होती त्यावेळेला शिवसेना मूग गिळून गप्प होती. असे ट्विट करत देशपांडेंनी सेनेला त्यांच्या भूमिकेची आठवण करुन दिली.

- Advertisement -

फॉक्सकॉन वेदांता हा प्रकल्प गुजरातला हलवल्यानंतर राज ठाकरे यांनी शिंदे- फडणवीस सरकारवर निशाणा साधला होता. फॉक्सकॉन- वेदांताचा सेमीकंडक्टर बनवण्याचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला. ह्या प्रकल्पाची एकूण गुंतवणूक १ लाख ५८ हजार कोटींची आहे. हा प्रकल्प पुण्याजवळ तळेगाव येथे होणार होता. प्रचंड रोजगारनिर्मितीची क्षमता असणारा प्रकल्प महाराष्ट्रातून निसटलाच कसा?, असा प्रश्न राज ठाकरेंनी विचारला होता. परंतु हा प्रकल्प गुजरातला गेल्यानं राजकीय वातावरण तापलं आहे.


हेही वाचा : आदित्य ठाकरेंच्या मेळाव्याला जशास तसं उत्तर देण्यासाठी कदमांनी फुंकलं रणशिंग


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -