घरमहाराष्ट्रअफझलखानाचा जितेंद्र आव्हाडांना पुळका; संदीप देशपांडेंचा हल्लाबोल

अफझलखानाचा जितेंद्र आव्हाडांना पुळका; संदीप देशपांडेंचा हल्लाबोल

Subscribe

अफझलखानाला पाठिंबा देत असतील तर ते महाराष्ट्रद्रोही आहेतच त्यासोबतच ते देशद्रोही सुद्धा आहेत.

सातारा जिल्ह्यातील प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफझलखान कबरीजवळ अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे. हे अनधिकृत बांधकाम हटवण्यात येणार असून, त्या संदर्भातील कारवाईला सुरूवात झाली आहे. त्यानुसार, आता कोणत्याही क्षणी अफझलखानाच्या कबरीजवळील अतिक्रमण हटवले जाणार आहे. यावरूनच आता मनसे (mns) नेते संदीप (sandeep deshpande) देशपांडे यांनी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर हल्लबोल केला केला आहे.

अफझलखानाच्या कबरी प्रकरणावरून मनसे नेते संदीप देशपांडे (sandeep deshpande) म्हणाले, ”अफझलखान कोण आहे? असं म्हणत संदीप देशपांडे यांनी आव्हाडांवर (jitendra awad) निशाणा साधला आहे. अफझलखानाच्या कबरीजवळ अनधिकृत बांधकाम तोडण्यासाठी जर कोण विरोध करत असेल आणि अफझलखानाला (afzalkhan) पाठिंबा देत असतील तर ते महाराष्ट्रद्रोही आहेतच त्यासोबतच ते देशद्रोही सुद्धा आहेत’. असं म्हणत संदीप देशपांडे यांनी आव्हाडांवर चांगलाच निशाणा साधला आहे. ‘राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कर्यकर्त्यांना अफझलखानाचा खूप पुळका आहे’. असं म्हणत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

- Advertisement -

काय आहे नेमके प्रकरण
दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, अफझलखानाच्या कबरीजवळील अतिक्रमणाचा वाद 1990पासून सुरू होता. अफझलखानाच्या कबरीभोवती वनखात्याच्या हद्दीत काही अतिक्रमणे केली जात होती. दर्गा बांधण्यात येत होता. तसेच, अफझलखानाचे दैवतीकरण केले होते. तसा आरोपही 1990 सालीच करण्यात आला होता. या आरोपानंतर सुरू झालेला वाद अद्याप सुरूच आहे.

- Advertisement -

याप्रकरणी न्यायालयाने 2017 साली निर्णय देत अतिक्रमण हटवण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्यानंतर अद्याप कारवाई झाली नव्हती. मात्र, आता ही कारवाई करण्यात येत आहे. बुधवारी रात्रीपासूनच गुप्तपणे या हालचालींना वेग आला होता. आता ही अतिक्रमणे पाडण्यास सुरुवात होत आहे. कबरीजवळ पोकलेन मशीन तैनात केली असून अनेक ठिकाणी बॅरिगेट्स लावली जात आहे.

1980 ते 85 या कालावधीत अफझलखानाच्या कबरीजवळ अतिक्रमण व्हायला सुरुवात झाल्याची माहिती मिळते. याठिकाणी उरूसही भरवण्यात आला होता. त्यानंतर या कबरीचे दर्शन घेण्याची सक्तीही करण्यात येऊ लागली. यावरुन हिंदुत्ववादी संघटनांनी आवाज उठवला होता. त्यानंतर ही कबर सामान्यांसाठी बंद झाली होती.


हे ही वाचा – देशात लोकसभा-विधानसभा निवडणुका एकत्रित होण्याची शक्यता

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -