घरताज्या घडामोडीवरूण सरदेसाईंवर गुन्हा दाखल झाला का?, संदीप देशपांडे यांचा सवाल

वरूण सरदेसाईंवर गुन्हा दाखल झाला का?, संदीप देशपांडे यांचा सवाल

Subscribe

मुख्यमंत्री दुसऱ्यांना सांगतात, मग स्वत:च्याच पक्षातील लोकांना घरी बसायला का सांगत नाहीत?

दहीहंडी उत्सव साजरा केल्याबद्दल आमच्या नेत्यांवर आणि पदाधिकाऱ्यांवर पोलिसांची कारवाई केली जाते. गर्दी करू नका असे मुख्यमंत्री दुसऱ्यांना सांगतात, मात्र त्यांच्या पक्षातील लोकांना सांगत नाही. नारायण राणे यांच्याविरोधात आंदोलन करणाऱ्या वरूण सरदेसाई यांच्यावर गुन्हा दाखल झाला का? सरदेसाई मुख्यमंत्र्यांचा भाचा आहे म्हणून त्याला सुट मिळते का? असा सवाल मनसेचे सरचिटणीस संदिप देशपांडे यांनी मंगळवारी केला. करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात दहीहंडी आणि गणेशोत्सवावर निर्बंध लादण्यात आले आहेत. अशावेळी दहीहंडी साजरी करणारे मनसे नेते बाळा नांदगावकरा यांच्यासह मनसेच्या काही नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या पार्श्वभूमीवर संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना काही सवाल केले आहेत.

राज ठाकरे यांच्या आदेशाप्रमाणे आम्ही दहीहंडी ठिकठिकाणी साजरी केली. मुख्यमंत्री दुसऱ्यांना सांगतात, मग स्वत:च्याच पक्षातील लोकांना घरी बसायला का सांगत नाहीत? आंदोलन करत असताना शिवसैनिकांना घरी बसायला का सांगितले नाही? वरुण सरदेसाईवर गुन्हा दाखल झाला का? तो भाचा आहे म्हणून एवढी सूट देताय का? अशी विचारणा त्यांनी केली.

- Advertisement -

एकेकाळी रँड नावाचा अधिकारीही असाच वागत होता. त्यावेळी चाफेकर बंधुंनी आवाज उठवला होता, आताही तशीच वेळ आता आली आहे. मुख्यमंत्री म्हणतात हे स्वातंत्र्ययुद्ध आहे का? तर हो हे स्वातंत्र्ययुद्धच आहे, असेही देशपांडे म्हणाले. मंदिर उघडण्याच्या मुद्द्यावरुन राज ठाकरे यांनी घंटानाद आंदोलनाचा इशारा दिला असून राज ठाकरे जो आदेश देतील त्यानुसार आम्ही आंदोलन करु असेही देशपांडे म्हणाले.

नांदगावकरांनी फोडली दहीहंडी

दरम्यान मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी काळाचौकी मैदानात दहीहंडी फोडली. पोलिसांनी कितीही नोटिसा पाठवल्या तरी आम्ही दहीहंडी उत्सव साजरा करणारच, असा निर्धार नांदगावकर यांनी याआधीच व्यक्त केला होता. त्यानुसार नांदगावकर यांनी स्वत: दहीहंडी फोडत हा उत्सव साजरा केला. पोलिसांनी नंतर त्यांना ताब्यात घेतले.

- Advertisement -

हेही वाचा :  सचिन वाझेंवर खासगी रुग्णालयात होणार शस्त्रक्रिया


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -