Homeमहाराष्ट्रSandeep Kshirsagar : अजितदादांची भेट घेऊन येताच क्षीरसागर यांचा मोठा दावा; म्हणाले,...

Sandeep Kshirsagar : अजितदादांची भेट घेऊन येताच क्षीरसागर यांचा मोठा दावा; म्हणाले, कृष्णा आंधळे हा…

Subscribe

Sandeep Kshirsagar On Krushna Andhale : कृष्णा आंधळे हा फरार असून त्याला वॉन्टेड घोषित केले आहे. यातच संदीप क्षीरसागर यांनी आंधळेबाबत मोठा दावा केला आहे.

मुंबई : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील फरार आरोप कृष्णा आंधळे हा सापडेल असं वाटत नाही. त्या भागाचा इतिहास पाहता, एखादा विषय अंगलट आल्यावर संबंधित माणूस सापडत नाही, असा मोठा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरदचंद्र पवार ) आमदार संदीप क्षीरसागर यांनी केला आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची मंत्रालयात भेट घेतल्यानंतर संदीप क्षीरसागर प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

“मी अजितदादा पवार यांच्या नेतृत्त्वाखाली काम केले आहे. एखादी चुकीची गोष्ट झाली असेल, तर ती अजितदादांना पटत नाही,” असं क्षीरसागर यांनी म्हटलं. त्यासह, “संतोष देशमुख हत्या प्रकरणात मास्टरमाइंड असलेल्या वाल्मिक कराडला व्हीआयपी ट्रिटमेंट दिली जाते,” असा आरोपही क्षीरसागर यांनी केला आहे.

हेही वाचा : झिशान सिद्दीकींनी पोलीस जबाबात नाव घेताच भाजप नेते आले समोर; म्हणाले, 15 वर्षांपासून…

क्षीरसागर म्हणाले, “संतोष देशमुख प्रकरणात गुन्हा दाखल 10 ते 12 तास उशिर झाला होता. त्या 10 ते 12 तासादरम्यान गुन्हा दाखल करण्यासाठी तिथले एसपी आणि प्रशासनाला कुणी-कुणी फोन केले, हे ‘सीडीआर’मधून कळणार आहे. ही सर्व माहिती घेऊन धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागेल.”

“संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळत आहे. वाल्मिक कराडला अटक झाली आहे; हे पाहून ज्यांच्यावर अन्याय झाला आहे, अशी लोक पुढे येत आहेत,” असं क्षीरसागर यांनी सांगितलं.

कृष्णा आंधळे फरार…

बीड पोलिसांनी कृष्णा आंधळेला वॉन्टेड घोषित केले आहे. कृष्णा आंधळेचा कुणाला ठावठिकाणा लागला तर त्याची तत्काळ माहिती देण्यात यावी, असे आवाहन बीड पोलिसांनी केले आहे. विशेषतः पोलिसांनी या प्रकरणी माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवून संबंधिताला योग्य ते बक्षीस देण्याचीही घोषणा केली आहे.

हेही वाचा : पुण्यात राऊतांसमोर माजी आमदार तडकाफडकी बैठकीतून बाहेर पडले, नाराजीचं कारण अंधारे की…