घरमहाराष्ट्रSangali: पाणी द्या, नाहीतर कर्नाटकात जातो; उजनी धरणातील पाणी प्रश्नावरून दुष्काळग्रस्तांचा सरकारला...

Sangali: पाणी द्या, नाहीतर कर्नाटकात जातो; उजनी धरणातील पाणी प्रश्नावरून दुष्काळग्रस्तांचा सरकारला इशारा

Subscribe

आमचा पाण्याचा प्रश्न जर महाराष्ट्र राज्याकडून मार्गी लागणार नसेल, तर आम्ही इथे राहून करायचं काय? असं जत तालुक्यातील ग्रामस्थांचं म्हणणं आहे.

सांगली: आमचा पाण्याचा प्रश्न जर महाराष्ट्र राज्याकडून मार्गी लागणार नसेल, तर आम्ही इथे राहून करायचं काय? महाराष्ट्र स्वतंत्र होऊन 64 वर्षे झाली तरी आम्हाला पाणी मिळू शकलेलं नाही. त्यामुळे जर का पाण्याचा प्रश्न मार्गी लागला नाही, तर आम्ही कर्नाटक राज्यात सहभागी होऊ, अशी भूमिका मंगळवेढा तालुक्यातील 24 गावांनी घेतली आहे. (Sangali Give water otherwise goes to Karnataka Drought victims warn the government over the water issue in Ujani Dam)

सांगलीच्या जत तालुक्यातील दुष्काळग्रस्तांनी आता पुन्हा कर्नाटकमध्ये जाण्याचा इशारा दिला आहे, यासाठी थेट आंदोलनदेखील सुरू केलं आहे. काँग्रेसचे आमदार विक्रम सावंत यांच्या नेतृत्वाखालील जवळपास 50 हून अधिक गावांनी संख येथे चक्री उपोषण सुरू केलं आहे. सांगली जिल्ह्यातील जत हा तालुका दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो.

- Advertisement -

नेमकं प्रकरण काय?

यंदा पाऊस खूप कमी झाला आहे. त्यामुळे पावसाअभावी जनावरांच्या चाऱ्याच्या आणि शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे, तसंच, खरिपाच्या पेरण्या 100 टक्के वाया गेल्या आहेत. तसंच, पाण्याच्या टँकरची मागणी आता गावागावातून वाढू लागली आहे. असं, असताना राज्य सरकार मात्र दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही या गावातील लोकांनी केला आहे.

कर्नाटक राज्याकडून तुबची बबलेश्वरच्या माध्यमातून जतच्या दुष्काळी 65 गावांना पाणी तातडीने मिळू शकतं, मात्र याबाबतीत राज्य सरकार चाल-ढकल करत आहे, याशिवाय विस्तारित म्हैशाळ योजनेला निधी मंजूर करून केवळ गाजर दाखवण्याचा उद्योग करण्यात आल्याचा आरोपदेखील दुष्काळग्रस्तांनी केला आहे.

- Advertisement -

सतेज पाटील म्हणाले…

जत ग्रामस्थांनी केलेल्या मागणीनंतर राज्याची माजी गृहराज्यमंत्री आणि काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, सरकारने सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांशी बोलून यासंदर्भात प्ल‌‌ॅन तयार केला पाहिजे. सीमा भागातील गावांचे प्रश्न समजून घेऊन दोन-तीन वर्षांत मार्गी लावू, असं सांगितलं पाहिजे. जेणेकरून अशा भूमिका ग्रामस्थांना घ्यायला लागू नयेत.

(हेही वाचा:Paytm Stocks : आरबीआयच्या निर्बंधांनंतर पेटीएमचे शेअर्स 10 टक्क्यांनी कोसळले; गुंतवणुकदारांना मोठा फटका )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -