घरCORONA UPDATEसंगमनेर-अकोलेत आढळले पाच नवे कोरोना रुग्ण

संगमनेर-अकोलेत आढळले पाच नवे कोरोना रुग्ण

Subscribe

अकोल्याची संख्या वीसवर तर संगमनेरची संख्या ८९ वर गेली आहे.

संगमनेरमध्ये बुधवारी चार महिला कोरोनाबाधित आढळल्या आहेत. यातील तीन महिला एकाच कुटूंबातील असून त्या निमोण येथील आहेत. तर शहरातील इंदिरानगरमध्येदेखील एक महिला बाधित आढळून आली आहे. याशिवाय अकोले तालुक्यातील समशेरपुर येथील एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली असल्याचे अहवालातून पुढे आले आहे. यामुळे अकोल्याची संख्या वीसवर तर संगमनेरची संख्या ८९ वर गेली आहे.

निमोण येथे ३० व ३१ वर्षीय महिलांसह १३ वर्षाची मुलगी बाधित आढळली आहे. या व्यक्तींच्या घरातील सदस्यदेखील यापुर्वी बाधित आढळल्याने या सर्वांना दोडी (सिन्नर) येथील बाधित व्यक्तीच्या संपर्कातून लागण झाल्याचा संशय आहे. तर शहराजवळील व शहरातील इंदिरानगरमध्ये वास्तव्यास असलेली एक ५७ वर्षीय महिलादेखील बाधित आढळून आली आहे. या महिलेला कोरोनाची लागण कशी झाली याचा प्रशासन शोध घेत आहे. दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर तब्बल चार महिला पॉझिटिव्ह आढळल्याने प्रशासनाची धावपळ उडाली आहे. संबधित महिलांच्या हायरिस्कमधील लोकांना तपासणीसाठी ताब्यात घेतले जाणार आहे.

- Advertisement -

निमोण येथे बाधित आढळलेेले कुटूंब विनापरवाना परजिल्ह्यातून संगमनेरमध्ये आले होते. यासंदर्भात प्रशासनाला त्यांनी माहिती दिलेली नव्हती. लक्षणे जाणवल्याने त्यांनी परस्पर शेजारच्या तालुक्यात तपासणीदेखील करुन घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तपासणीत त्यांचे वर्तन संशयास्पद वाटल्याने याची माहिती आरोग्य यंत्रणेला देण्यात आली होती. या व्यक्तींनी तेथे खोटे नाव सांगितल्याचे समोर आले. रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संबधित वाहनाचा शोध घेतल्यानंतर या प्रकाराचा उलगडा झाला. निमोणमधील रुग्णसंख्या आता चौदावर गेली आहे.

समशेरपुरमध्ये आढळला दुसरा रुग्ण

अकोले तालुक्यात यापुर्वी बाहेरच्या जिल्ह्यातून आलेले १९ रुग्ण ठणठणीत बरे झाल्यानंतर हा तालुका कोरोनामुक्त झाला होता. बुधवारी मात्र समशेरपुरमध्ये रुग्ण आढळल्याने हा तेथील दुसरा रुग्ण तर तालुक्यातील पहिलाच स्थानिक रुग्ण आहे. यापुर्वी देखील येथे एक व्यक्ती वाधीत आढळला होता. संबधित व्यक्ती भाजीपाला घेऊन कल्याणला जात असल्याची माहिती पुढे आली असून तेथेच त्याला कोरोनाची लागण झाल्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -