संगमनेर शहर ‘कोरोनामुक्त’

संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रूक येथील एक आणि शहरातील ३ अशा ४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे १४ दिवसानंतरचे अहवाल निगेटिव्ह आल्याने आता संगमनेर तालुका कोरोनामुक्त झाला आहे.

sangamner free from coronavirus
संगमनेर शहर 'कोरोनामुक्त'

संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रूक येथील एक आणि शहरातील तीन अशा चार कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे चौदा दिवसानंतरचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना नगरच्या रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. मात्र, संगमनेर प्रशासनाने खबरदारीची उपाययोजना म्हणून या चारही जणांना पुढील काही दिवस संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवण्यात आल्याची माहिती प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी ‘आपलं महानगर’ला दिली आहे.

कोरोनामुक्त रुग्णांना केले होम क्वॉरंटाइन

दिल्लीच्या मरकजशी संबधीत कोरोनाबाधित जामखेडमध्ये आढळले होते. त्यांच्या संपर्कात आलेल्या संगमनेरमधील पंधरा संशयितांना तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. त्यातील चौघांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्यावर नगरच्या बुथ रुग्णालयात उपचार सुरु होते. तर अन्य लोकांचे अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर प्रशासनाने त्यांना संस्थात्मक देखरेखीखाली ठेवले होते. त्यांचादेखील हा कालावधी संपल्याने त्यांना आता घरीच होम क्वॉरंटाइन करण्यात आले आहे.

याशिवाय नाशिकच्या रुग्णाच्या संपर्कातील एकाला कोरोनाची बाधा झाल्याचे आढळल्याने तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या चारवर गेली होती. संगमनेरमध्ये चार रुग्ण आढळल्याने संगमनेर कोरोनाचे हॉटस्पॉट झाले होते. त्यामुळे संगमनेरमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसिलदार अमोल निकम यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाने कठोर पाऊले उचलली, त्यामुळे ही संख्या चारवरच सिमीत राहीली. तालुक्यात कोरोना संशयितांची आरोग्य तपासणी सुरु असली तरी रुग्णसंख्येत वाढ झाली नाही. त्यामुळे संगमनेरकरांसाठी ही दिलासादायक बाब ठरली आहे. आता संगमनेरमधील सर्वच कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने संगमनेर तालुक्यात कोरोनाबाधित एकही रुग्ण नसल्याने संगमनेर तालुका कोरोनामुक्त झाला असला तरी संगमनेरकरांनी ३ मेपर्यत लॉकडाऊनचे पालन करावे, घराबाहेर पडू नये, घरात बसून सहकार्य करा, असे आवाहन तहसिलदार अमोल निकम यांनी केले आहे.


हेही वाचा – लॉकडाऊनमध्येही लग्न करत वरात आणली मोटर सायकलवरून घरात!