सांगलीतील जतमध्ये भीषण अपघात झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
शक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी स्थानिकांनी व पोलिसांनी धाव घेतली.
कारने डंपरला दिलेल्या या धडकेत स्विफ्ट कारमधील पाच जणांचा मृत्यू झाला. या कारमध्ये आजी-आजोबा आणि सून व नातू असल्याची माहिती समोर येत आहे.
या कारमध्ये आजी-आजोबा आणि सून व नात असल्याची माहिती समोर येत आहे.
या फाट्याजवळ शुक्रवारी मध्य रात्रीच्या सुमारास एक स्विफ्ट कार गाणगापूर येथे दर्शन घेऊन येत होती.
सांगलीतील जतपासून पाच किलोमीटरच्या अंतरावर अमृतवाडी फाटा आहे.
त्यावेळी समोर येणाऱ्या ट्रकपासून वाचण्यासाठी कार चालकाने गाडी बाजूला घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या डंपरला या कारने जोराची धडक दिली.
सांगलीतील जतमध्ये असलेल्या विजापूर-गुहाघर मार्गावरील अमृतवाडी फाट्याजवळ हा अपघात झाला.
शक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी स्थानिकांनी व पोलिसांनी धाव घेतली.