घरमहाराष्ट्रSangli Constituency : चंद्रहार पाटील यांना सांगलीतून उमेदवारी जाहीर; उद्धव ठाकरेंची घोषणा

Sangli Constituency : चंद्रहार पाटील यांना सांगलीतून उमेदवारी जाहीर; उद्धव ठाकरेंची घोषणा

Subscribe

मुंबई : डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत 10 दिवसांपूर्वीच मातोश्रीवर ठाकरे गटात प्रवेश केला होता. यानंतर आज मिरजेतील सभेत उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील यांना सांगलीतून उमेदवारी जाहीर केली आहे. (Sangli Constituency Chandrahar Patil announced candidature from Sangli Uddhav Thackerays announcement)

हेही वाचा – Arvind Kejriwal : दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना अटक होणार? ईडीची टीम केजरीवाल यांच्या घरी

- Advertisement -

मिरजेतील सभेत भाजपावर निशाणा साधताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आम्ही भाजपाला सोडलं, परंतु आम्ही हिंदुत्व नाही सोडलं आणि सोडणारही नाही. कारण दुसऱ्या धर्माचा द्वेष करणं हे ना आम्हाला छत्रपतींनी शिकवलं ना शिवसेना प्रमुखांनी शिकवलं. आम्ही हिंदू आहोत, तुम्ही इस्लाम पाळणारे असाल, पण ख्रिश्चन लोकं माझ्यासोबत येत आहेत आणि समोरून येऊन सांगतात की, उद्धव ठाकरे तुम्ही चिंता करू नका आम्ही तुमच्यासोबत आहोत. कारण ही जी भंपक हिंदुत्वगिरी चाललेली आहे, ज्याला मी गोमूत्र धारी हिंदुत्व म्हणतो, नुसतं देवळात घंटा बडवणारं हिंदुत्व म्हणतो आणि हिंदुत्वाच्या नावाखाली संपूर्ण देश नासून टाकणारा भारतीय जनता पक्ष आहे. ते जे म्हणतात ते हिंदुत्व मानायला आम्ही तयार नाही, असे उद्धव ठाकर म्हणाले.

आमचं हिंदुत्व मी अनेकदा सांगितलं आहे. कोणाचा गैरसमज होऊ नये म्हणून पुन्हा सांगतो असे म्हणत उद्धव ठाकरे म्हणाले की, शिवसेनेचं हिंदुत्व हे घरातली चूल पेटवणार आहे, हाताला काम देणारं आहे आणि भाजपाचं हिंदुत्व हे घर पेटवणारं आहे. तुम्ही ठरवायचं कोणतं हिंदुत्व तुम्हाला पटतंय? चूल पेटवणार पाहिजे, काम हाताला काम देणार पाहिजे की, घर पेटवणारं पाहिजे? असा प्रश्न उपस्थित करत आज मी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर करतो आहे. शिवसेनेच्या मशालीवरती चंद्रहार पाटील हा मर्द तुम्हाला दिलेला आहे. हा मर्द तुमच्यासाठी लढायला उतरलेला आहे. याला जिंकून देण्याचा मर्दपणा तुम्हाला दाखवावा लागेल. सांगलीकरांना सांगावं लागेल की आम्ही पण मर्द आहोत, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.

- Advertisement -

हेही वाचा – Congress : काँग्रेसचे सर्व उमेदवार ठरले; नाना पटोले यांची माहिती

दरम्यान, लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली भाजपाने महाराष्ट्रातील 20 उमेदरावांच्या नावांची घोषणा केली आहे. तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश होण्याची शक्यता मावळल्याने बदलेल्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी आघाडीची बैठक झाली. या बैठकीला महाविकास आघाडीत लोकसभा जागावाटपाचे ठाकरे गट 20, काँग्रेस 18 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 10 असे सूत्र निश्चित झाले आहे. मात्र, सांगली आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून आघाडीत सुरू असलेली रस्सीखेच अजून थांबलेली नाही. या दोन जागांवर तसेच वंचित बहुजन आघाडीच्या मागण्यांवर बैठकीत चर्चा झाली. अशातच आता उद्धव ठाकरे यांनी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना सांगली मतदार संघातून उमेदवारी जाहीर केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -