घरताज्या घडामोडीसांगलीचा लॉकडाऊन २ दिवसांनी वाढवला, आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्यात येणार

सांगलीचा लॉकडाऊन २ दिवसांनी वाढवला, आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्यात येणार

Subscribe

कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या गावांमध्ये टास्क फोर्स पाठवून परिणामांची कारणमीमांसा करण्याच्या सूचना करण्यात आल्या

सांगलीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून कोरोनाबाधितांची संख्येत वाढ झाली आहे. वाढत्या कोरोनाबाधितांच्या संख्येमुळे सांगलीमध्ये ५ मे पासून १५ मे पर्यंत लॉकडाऊन करण्यात आला आहे. परंतु या लॉकडाऊनमुळे कोरोनाबाधितांची संख्या कमी झाली नसली तरी थोड्या प्रमाणात घट झाला आहे. यामुळे शनिवारी घेण्यात आलेल्या कोरोना परिस्थितीच्या आढावा बैठकीत सांगली जिल्ह्यातील लॉकडाऊन २ दिवसांनी म्हणजे १७ मे पर्यंत वाढवण्यात आला असल्याचे जलसंपदा मंत्री आणि सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी सांगितले आहे. सांगलीमध्ये कोरोना परिस्थिती अधिक सुधारण्यासाठी १७ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे.

सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी ट्विट करत माहिती दिली आहे की, सांगली जिल्ह्यातील लॉकडाऊनचा आढावा ऑनलाइन बैठकीद्वारे घेतला. जिल्ह्यात ५ मे पासून १५ मे पर्यंत कडक लॉकडाऊन पाळला गेला यामुळे कोरोना रुग्णसंख्या रेट कमी झाला नसला तरी ३०%पर्यंत स्थिर झाला ही समाधानाची बाब आहे. स्थिती सुधारण्यासाठी जिल्ह्यात १७ मेपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे.

- Advertisement -

सर्व लोकप्रतिनिधींशी चर्चा करून ३ दिवस लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. परिस्थितीचा आढावा घेऊन सोमवारी पुढील निर्णय घेण्यात येईल. नागरिकांनी कृपया शासनाला सहकार्य करावे. कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या गावांमध्ये टास्क फोर्स पाठवून परिणामांची कारणमीमांसा करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. व्हेंटिलेटर बेड संदर्भात यंत्रणांनी अत्यंत काटेकोर समन्वय ठेवणे आवश्यक असून कोणत्याही गरजवंत रुग्णाला व्हेंटिलेटरवरील उपचारांची गरज असताना गैरसोय निर्माण होऊ नये यासाठी बेड हे डेडिकेटेड ठेवावेत. महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभार्थी रुग्णाला लाभ मिळालाच हवा अशी सूचना आढावा बैठकीत करण्यात आली आहे.

- Advertisement -

शेतीच्या वस्तूंची घरपोच डिलिव्हरी

सर्व लोकप्रतिनिधींनी केलेल्या मागणीनुसार खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांची खते, बी-बियाणे, कीटकनाशके याबाबत गैरसोय होऊ नये यासाठी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांनी कृषी निविष्ठा दुकानदारांशी चर्चा करून कोरोना संसर्ग टाळून घरपोच डिलिव्हरी करता येईल का, याबाबत चर्चा करण्याची सुचना केली.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -