धक्कादायक! सांगलीतील मिरजेत विष प्राशन करून ९ जणांची सामूहिक आत्महत्या

एकाच कुटुंबातील ९ जणांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सांगलीतील मिरजेत घडली. दोन कुटुंबातील नऊ जणांचा मृत्यू झाल्याने सांगली हादरली आहे. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत अधिक तपासाला सुरूवात केली आहे.

Sangli

दोन कुटुंबातील ९ जणांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सांगलीतील (Sangli) मिरजेत घडली. नऊ जणांचा मृत्यू झाल्याने सांगली हादरली आहे. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत अधिक तपासाला सुरूवात केली आहे. पोलिसांच्या (Police) तपासातून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याचे समजते. आत्महत्या केलेल्या कुटुंब हे एका पशुवैद्यकीय डॉक्टरचं होते.

सांगलीतल्या मिरज तालुक्यातील म्हैसाळमध्ये (Miraj Family Suicide) ही धक्कादायक घटना घडली आहे. म्हैसाळ येथील माणिक यल्लाप्पा वनमोरे आणि पोपट यल्लपा वनमोरे या दोन भावाच्या कुटुंबातील 9 जणांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची माहिती आहे. आत्महत्या केलेल्या ९ जणांमध्ये एका पशुवैद्यकीय डॉक्टरचा समावेश आहे. घटनास्थळी पोलिस व ग्रामस्थांनी गर्दी केली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार डॉ. माणिक येलाप्पा वनमोरे, आक्काताई वनमोरे (आई), रेखा मानिक वनमोरे (बायको), प्रतिमा वनमोरे (मुलगी), आदित्य वनमोरे (मुलगा) आणि पोपट येलाप्पा वनमोरे (शिक्षक), अर्चना वनमोरे (पत्नी), संगीता वनमोरे (मुलगी), शुभम वनमोरे (मुलगा) यांचा समावेश आहे.

आत्महत्येचे कारण

पोलिसांनी घटनास्थळी केलेल्या तपासानंतर मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आर्थिक विवंचनेतून ही आत्महत्या केली गेली असावी, अशी शंका व्यक्त केली जाते आहे. मात्र अद्याप याबाबत अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही.

पोलिसांकडून या आत्महत्येप्रकरणी अधिक तपास केला जातो आहे. सर्व मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवण्याची प्रक्रिया केली जातेय. पोस्टमॉर्टेमचा रिपोर्ट आल्यानंतर याबाबत अधिक खुलासा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनाही पोस्टमॉर्टेम रिपोर्टची प्रतीक्षा लागून राहिली आहे.


हेही वाचा – मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर शस्त्रक्रिया पूर्ण, प्रकृतीबाबत रूग्णालयाच्या वतीने सविस्तर माहिती देण्यात येणार