घरमहाराष्ट्रसांगलीत शिक्षकांच्या दोन गटामध्ये तुफान हाणामारी

सांगलीत शिक्षकांच्या दोन गटामध्ये तुफान हाणामारी

Subscribe

सांगलीमध्ये शिक्षकी पेशाला काळीमा फासल्याची घटना घडली आहे. शिक्षकांच्या दोन गटामध्ये झालेल्या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. आणि भर सभेत शिक्षकांनी एकमेकांना तुफान हाणामारी केली.

सांगलीमध्ये शिक्षकांच्या दोन गटामध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या वार्षिक सभेमध्ये शिक्षकांच्या सत्ताधारी आणि विरोधकांच्या गटामध्ये हाणामारी झाली आहे. अक्षरक्ष: एकमेकांच्या अंगावर बसून मारहाण करण्यात आली तर काहींनी खुर्च्या फेकून मारल्याचे देखील समोर आले आहे. या हाणामारीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. ते पाहून हे कसले शिक्षक असा सवाल केला जात आहे.

शिक्षकी पेशाला काळीमा फासली

सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या ६६ व्या वार्षिक सभेचे रविवारी सकाळी सांगलीच्या दिनानाथ नाट्यगृहामध्ये आयोजन करण्यात आले होते. सभेमध्ये सत्ताधारी गटाने वार्षीक अहवाल मांडायला सुरुवात केली. मात्र विरोधी गटाने त्यांच्या कामावर आक्षेप घेत. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप लावला. त्यामुळे सभेमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर विरोधी गटाने मंचावर जाऊन सत्ताधारी गटाचे संचालक शशिकांत बजबळे यांना व्यासपीठावर खाली पाडून मारहाण केली. त्यानंतर सभागृहात दोन्ही गटामध्ये तुफान हाणामारी झाली.

- Advertisement -

शिक्षकांची फ्री स्टाईल हाणामारी

सभागृहात सुर असलेल्या सभेमध्ये दोन्ही गटातील शिक्षकांनी आक्रमक होऊन एकमेकांना फ्री स्टाईल हाणामारी केली. सभागृहात तुफान हाणामारी सुरु असतानाच कोणी तरी अचानक सभागृहातील लाईट बंद केल्यामुळे या आणखी जोरदार हाणामारी झाली. दरम्यान विरोधकांनी हाणामारी करण्याची पूर्व तयारी करुन आले असल्याचा आरोप सत्ताधारी गटाने केला आहे. बँकेतील घोटाळ्याबाबत सहकार आयुक्तांकडे तक्रार करणार आहोत, असे विरोधी गटाकडून सांगण्यात आले आहे.

पोलिसात तक्रार दाखल करणार

सभेत गोंधळ घालणाऱ्यांविरोधात पोलिसात तक्रार दाखल करणार असल्याचे शिक्षक बँकेच्या अध्यक्षांनी सांगितले आहे. तर फेरसभा घेण्यात यावी अशी मागणी विरोधी गटाने केली आहे. दरवर्षी शिक्षक सहकारी बँकेच्या सभेत राडा होतो. मात्र, यावेळी शिक्षकांनी सभेला आखाडाच बनवले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -