खवळलेल्या समुद्राने गिळलं कुटुंब! सांगलीतील एकाच कुटुंबातील पित्यासह दोन मुलं ओमनच्या समुद्रात गेली वाहून

sangli three people father and two children drowned in the sea saudi arabia oman

खवळलेल्या समुद्राच्या एका लाटेत सारं कुटुंब उद्धस्त झाल्याची ह्रदयद्रावक घटना समोर आली आहे. सांगली जिल्ह्यातील जतमधील एक कुटुंब ओमान देशातील समुद्रात पर्यटनासाठी गेले होते. मात्र अचानक आलेल्या लाटेत कुटुंबातील तिघांचा एकाच वेळी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना रविवारी घडली आहे. या घटनेवर संपूर्ण सांगलीतून हळहळ व्यक्त केली जात आहे.

या घटनेत सांगलीतील शशिकांत म्हणाणे यांच्यासह त्यांची नऊ वर्षांची मुलगी श्रृती आणि सहा वर्षांचा मुलगा श्रेयस याचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे. ज्यात दोघं जण वाहून गेल्याचं स्पष्टपणे दिसतेय. या घटनेला मृत शशिकांत म्हणाणे यांचे भाऊ वकील राजकुमार म्हणाणे यांनी दुजोरा दिला आहे.

सांगलीतील जत तालुक्यात राहणारे हे शशिकांत म्हणाणे हे अनेक वर्षांपासून दुबईत वास्तव्यास आहेत. म्हणाणे हे दुबईतील एका कंपनीत सेल्स मॅनेजर पदावर कार्यरत होते. दरम्यान बकरी ईदनिमित्त सुट्टी असल्याने मृत शशिकांत म्हणाणे आपल्या पत्नी, मित्र आणि दोन मुलांसह दुबईजवळील ओमानमधील समुद्र किनारी फिरायला गेले होते. यावेळी खवळलेल्या समुद्रातून अचानक उसळलेल्या लाटेत कुटुंबातील शशिकांत म्हणाणे यांच्यासह त्यांची दोन मुलं वाहून गेले आहेत. यात त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. दोन दिवसांच्या तपासानंतर मुलगा व वडिलांचा मृतदेह सापडला. मात्र, मुलीचा शोध लागला नाही. धक्कादायक बाब म्हणजे शशिकांत यांची पत्नी सारिका म्हणाणे यांच्या समोरच ही घटना घडल्यानं त्यांच्यावरही मोठा आघात झालाय.

सांगलीतील निवृत्त शिक्षक सिद्राम म्हणाणे यांच्या तीन मुलांपैकी शशिकांत म्हणाणे हे एक आहेत. गेल्या पंधरा वर्षांपासून ते दुबईत वास्तव्यास होते. यांच्यासह शशिकांत यांचे मित्र बाळासाहेब भारत यादव हेही देखील दुबईत अभियंता म्हणून नोकरी करतात. दरम्यान यादव हेही या सहलीसाठी आल्या कुटुंबियांसह उपस्थित होते. मात्र ते या घटनेतून वाचलेत. मात्र म्हमाणे कुटुंबीयांवर या घटनेनं दुःखाचा डोंगर कोसळलाय.


ठाकरेंना बोलू नका; किशोरी पेडणेकरांकडून केसरकरांना सुनावले