घरCORONA UPDATECoronaEffect: ग्रामीण महिलांच्या मदतीसाठी आला 'पॅड मॅन'; मोफत देणार ‘सॅनिटरी पॅड’!

CoronaEffect: ग्रामीण महिलांच्या मदतीसाठी आला ‘पॅड मॅन’; मोफत देणार ‘सॅनिटरी पॅड’!

Subscribe

ग्रामीण भागातील तब्बल १० हजार महिलांना ‘सॅनिटरी पॅड’ मोफत वाटण्याचे काम किरण चौधरी यांच्या संस्थेने हाती घेतले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यामुळे अनेकांचे रोजगार बंद झाले आहेत. अशा परिस्थितीत गरीब कुटुंबियातील महिला त्यांच्या उदरनिर्वाहासाठी किराणा माल भरण्याला जास्त महत्व देत आहेत. तर काही प्रमाणात स्वतःच्या आरोग्याकडेही दुर्लक्ष करत आहेत. ग्रामीण भागातील महिला मासिक पाळीत पुन्हा सॅनिटरी पॅड वगळून कपड्याचा वापरत करत असल्याची माहिती समोर येताच त्यांच्या मदतीसाठी महाराष्ट्रातील पॅड मॅनने पुढाकार घेतला आहे. ग्रामीण भागातील तब्बल १० हजार महिलांच्या आरोग्याच्या काळजीपोटी ‘सॅनिटरी पॅड’ मोफत वाटण्याचे काम या पॅड मॅनने हाती घेतले आहे. किरण चौधरी असे या राज्यातील पॅड मॅनचे नावा आहे. शुभंकरोती या त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून ‘सॅनिटरी पॅड’ मोहीम ते राबवत असून त्यामुळे चहुबाजूंनी किरणवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

‘ना नफा ना तोटा’ या धर्तीवर ‘सॅनिटरी पॅड’ निर्मितीचा प्रकल्प नांदेडमध्ये उभारण्यात आला आहे. अत्यंत मुबलक दरात संस्थेकडून आतापर्यंत ग्रामीण भागातील महिलांना सॅनिटरी पॅड उपलब्ध करून देत होतो. मात्र आता या लॉकडाऊनमुळे ग्रामीण भागातील महिलांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. त्यामुळे दहा हजार ग्रामीण भागातील गरीब महिलांना आणि मुलींना मोफत ‘सॅनिटरी पॅड’ वाटप करत आहेत.
– किरण चौधरी, अध्यक्ष, शुभंकरोती फाऊंडेशन

- Advertisement -

२५० गावात संस्था कार्यरत

मराठवाडा, विदर्भातील सामाजिक व आर्थिक मागास परिसरातील महिला तसेच मुलींना समान हक्क, शिक्षण, आरोग्य आणि त्यांच्या समस्यांवर शुभंकरोती फाऊंडेशन ही सामाजिक संस्था गेली ८ वर्ष मराठवाड्यातील २५० गावात कार्यरत आहे. मराठवाड्यातील, नांदेड, हिंगोली आणि परभणी या जिल्हांमध्ये गावपातळीवर या संस्थेअंतर्गत ९० महिला कार्यरत आहेत. अनेक सामाजिक संस्थांच्या माध्यमातून तसेच ‘पॅड मॅन’ चित्रपटच्या माध्यमातून ‘सॅनिटरी पॅड’बाबत देशात जनजागृती झाली. त्यामुळे ग्रामीण भागातील महिलादेखील सॅनिटरी पॅडचा वापर करू लागल्या. मात्र या लॉकडाऊनच्या काळात हातमजुरी करणाऱ्यांना रोजगार नाहीत. त्यामुळे या महिला मुख्य गरजा भागवण्यावर जास्त भर देत आहेत. परिणामी त्या पुन्हा मासिक पाळीमध्ये कपडा वापराकडे वळल्या आहेत.

‘डोअर टू डोअर’ वाटप

सध्या मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली आणि परभणी या जिल्हाच्या गाव-खेड्यातील महिलांची आर्थिक परिस्थिती नाही. अशांना डोअर टू डोअर जाऊम मोफत सॅनिटरी पॅडचे वितरण सुरू आहे. गाव पातळीवर शुभंकरोती फाऊंडेशनच्या महिला कार्यकर्ता काम करत असून त्यांच्या माध्यमातून हे वितरण सुरू आहे, अशी माहिती शुभंकरोती फाऊंडेशनचे अध्यक्ष किरण चौधरी यांनी दिली.

- Advertisement -

३० हजार सॅनिटरी पॅडचे वाटप

ग्रामीण भागातील गोरगरीब १० हजार महिलांना सॅनिटरी पॅडचे मोफत वाटप करण्याचे उद्दिष्ट संस्थेचे आहे. त्याची सुरुवात सुद्धा झाली असून या दहा हजार महिलांना तब्बल तीन महिन्यांकरता सॅनिटरी पॅड वितरण करायचे आहेत. प्रत्येक महिन्याला प्रत्येक महिलाला संस्थेकडून तीन पॅकेट सॅनिटरी पॅड देण्यात येत आहेत. अशा १० हजार महिलांना शुभंकरोती फाऊंडेशनच्या मार्फत ३० हजार सॅनिटरी पॅडचे मोफत वाटप करण्यात येत आहेत. आतापर्यंत ५ हजार सॅनिटरी पॅडचे वाटप झाले आहे.

 

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -