घरमहाराष्ट्रबिबट्याचा मानवी वस्तीतील वावर थांबविण्यासाठी आरेमध्ये ५६ ठिकाणी स्वच्छता अभियान

बिबट्याचा मानवी वस्तीतील वावर थांबविण्यासाठी आरेमध्ये ५६ ठिकाणी स्वच्छता अभियान

Subscribe

यात आरेतील सर्व जनतेने तसेच सेवाभावी संस्थेने उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन स्थानिक जनतेने आपला परिसर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य करावे, असे आवाहन जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रवींद्र वायकर यांनी उपस्थित जनतेला तसेच अधिकार्‍यांना केले. ठाणे वनविभागांतर्गत असलेले मुंबई वनपरिक्षेत्रातील गोरेगाव परिसरातील आरे कॉलनी दिंडोशी, बिंबिसार याठिकाणी गेल्या काही महिन्यांपासून बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना घडल्या होत्या.

मुंबई : आरेच्या विविध भागांमध्ये कचर्‍याचे प्रमाण वाढले असून, अनेक ठिकाणी मुक्त जनावरांचा संचारही वाढला आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी स्थानिक जनतेबरोबरच येणारे पर्यटकही कचरा करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. आरेमध्ये अशी एकूण ५६ ठिकाणी आढळली आहेत. यामुळे बिबट्याचा वावर या अशा ठिकाणी वाढत असल्याचे आढळून येत असून आरेचा परिसर कचरामुक्त करण्यासाठी करण्यासाठी शिवसेनाप्रमुखांच्या जयंतीनिमित्त या ५६ ठिकाणी सकाळी ८ वाजल्यापासून आरेमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्याचा संकल्प करण्यात आलाय.

यात आरेतील सर्व जनतेने तसेच सेवाभावी संस्थेने उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन स्थानिक जनतेने आपला परिसर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य करावे, असे आवाहन जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रवींद्र वायकर यांनी उपस्थित जनतेला तसेच अधिकार्‍यांना केले. ठाणे वनविभागांतर्गत असलेले मुंबई वनपरिक्षेत्रातील गोरेगाव परिसरातील आरे कॉलनी दिंडोशी, बिंबिसार याठिकाणी गेल्या काही महिन्यांपासून बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना घडल्या होत्या. बिबट्याच्या वावराबाबत आरेतील अनेक ठिकाणांची पाहणी केली असता अनेक भागांमध्ये घाणीचे साम्राज्यावर, कचर्‍याचे ढीग, या कचर्‍यामध्ये अन्न पदार्थांच्या शोधात येणारी कुत्री, डुक्कर, गायी, म्हशी, कोंबड्या इत्यादी प्राण्याच्या वावर आढळून आला. त्यामुळे बिबट्या प्राणी भक्ष्याच्या शोधात मानवी वस्तीत येतात आणि भक्ष्य समजून मानवांवर हल्ले करत असल्याने यावर उपाययोजना करण्यासाठी उप वनसंरक्षक, ठाणे वनविभाग कार्यालयाने गुरुवारी आरेमध्ये बैठक बोलावली होती.

- Advertisement -

आपण ज्या ठिकाणी राहतो तो परिसर नेहमी स्वच्छ ठेवणे, ही स्थानिक जनतेची जबाबदारी आहे. या वस्त्यांमधून जमणारा दैनंदिन कचरा मनपाने उचलला पाहिजे. बिबट्याचा मानवी वस्तीवरील वावर कमी करण्यासाठी स्वच्छतेला प्राधान्य देण्यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनी ५६ ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्याची घोषणा, वायकर यांनी यावेळी केली. या मोहिमेत स्थानिक रहिवाशांबरोबर सेवाभावी संस्थांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही वायकर यांनी यावेळी केले.

बैठकीच्या सुरूवातीला सह वनसंरक्षक (ठाणे) गिरीजा देसाई यांनी, एनपॉवर ङ्गाऊंडेशन या संस्थेकडून आरेमध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणात ५६ ठिकाणी कचर्‍याचे ढिग व २७ पाड्यांमध्ये स्ट्रीट लाईटचा अभाव असल्याचे आढळून आल्याची माहिती दिली. तर मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाच्या उपायुक्त संगीत हसनाळे यांनी आरेमधून दरदिवशी १८ मेट्रीक टन कचरा गोळा होतो.

- Advertisement -

यात १६ मेट्रीक टन कचरा हा ओला असतो व २ मेट्रीक टन कचरा हा सुका असतो. आरेतील आदिवासी पाडे हे लांब लांब असल्याने तेथील कचरा हा दरदिवशी उचलला जात आही त्याचबरोबर यापुढे वस्त्यांमध्ये ई व्हेईकलच्या माध्यमातून कचरा उचलण्यास सुरूवात करण्यात येणार आहे. त्याप्रमाणे येथील रहिवाशांना मनपातर्ङ्गे तीन डबे देण्यात येणार आहेत. यात निळा, हिरवा व काळ्या रंगाच्या डब्याचा समावेश आहे. रहिवाशांना मनपातर्ङ्गे कचरा वर्गीकरणाचे प्रशिक्षणही देण्यात येणार आहे. करच्याचे व्हिलेवाट लावण्यासाठी आरे प्रशासनाने जागा उपलब्ध करुन दिल्यास प्रकल्पही उभारण्यास मनपाची तयारी आहे. आरेतील रहिवाशांसमवेत कचर्‍यापासून रोजगार निर्मिर्ती करण्यासही मनपा तयार आहे. एवढेच नव्हे तर आरेत तयार होणार्‍या कचर्‍यापासून विजनिर्मिती करणे शक्य असून या विजेपासून आरेतील पथ दिव्यांना देणे शक्य होणार असल्याची माहिती हसनाळे यांनी यावेळी दिली.

या बैठकीला गिरिजा देसाई, सह वनसंरक्षक अधिकारी, आर.व्ही.भोर्टर, वनक्षेत्रपाल, संगिता हसनाळे (उपायुक्त), संतोषकुमार धोंडे (सहाय्यक आयुक्त), नगरसेविका रेखा रामवंशी, तुषार पिंपळे (सहा. अभियंता), भारत तोरणे, सुभाष दळवी, महिला विधानसभा संघटक शालिनी सावंत, शाखाप्रमुख विलास तावडे, उपविभागप्रमुख जितेंद्र वळवी, संदीप गाढवे, गावदेवी मंदिराचे विश्‍वस्थ उपस्थित होते.

बिबट्याच्या हल्ल्यातील ४ गंभीर जखमींना ठाणे वनविभागाकडून सव्वा लाखांच्या मदतीचा चेक
बिबट्याच्या हल्ल्यातील गंभीर जखमी झालेल्या आरेतील चार जणांना उप वनसंरक्षक, ठाणे वनविभाग यांच्यातर्फे सव्वा लाख रुपयांचा मदतीच्या चेकचे आमदार रवींद्र वायकर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यात निर्मला देवी सिंग (आरे डेअरी जवळ), आयुष यादव (युनिट ३), राजेश प्रेमसिंग रावत (संतोष नगर), दर्शन सतु कुमार सिंह (युनिट १३) यांना या चेकचे वाटप करण्यात आले.

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -