घरताज्या घडामोडीसंजय बियाणी हत्याकांडाचं गूढ उलगडलं, पोलिसांनी ७ जणांच्या मुसक्या आवळल्या

संजय बियाणी हत्याकांडाचं गूढ उलगडलं, पोलिसांनी ७ जणांच्या मुसक्या आवळल्या

Subscribe

बियाणी यांच्यावर गोळीबार करणारे दोन आरोपी उत्तर प्रदेश आणि हरियाणामधील असल्याचा पोलिसांना संशय आहे. यूपीच्या आरोपीवर ६ गंभीर गुन्हे तर हरियाणाच्या आरोपींवर १३ खुनाचे गुन्हे दाखल आहेत.

नांदेडमधील प्रसिद्ध बांधकाम उद्योजक संजय बियाणी (Sanjay Biyani ) यांची राहथ्या घरासमोर हत्या करण्यात आली होती. या हल्ल्याचे गूढ अखेर उलगडलं आहे. पोलिसांनी आतापर्यंत ७ जणांना ताब्यात घेतलं आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या प्रकरणाची दखल घेतली होती. विशेष पथक चौकशीसाठी तयार करण्यात आले होते. बियाणींची भर दिवसा दोन अज्ञात हल्लोखोरांनी गोळ्या घालून हत्या (Biyani Murder Case) केली होती.

नांदेड येथील बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची त्यांच्या घरासमोर हत्या करण्यात आली. बियाणी यांच्या हत्येला अडीच महिन्यांचा कालावधी झाला तरी त्यांचे मारेकरी अद्याप गजाआड झाले नाही. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी गठीत करण्यात आली होती. पोलिसांनी अथक मेहनत घेऊन सात आरोपींना ताब्यात घेतलं आहे. यापैकी १ आरोपी पंजाब तर ६ आरोपी नांदेड येथून ताब्यात घेण्यात आले होते. या संजय बियाणींची गोळ्या घालून हत्या करणारे दोन हल्लेखोर फरार आहेत.

- Advertisement -

बियाणी यांच्यावर गोळीबार करणारे दोन आरोपी उत्तर प्रदेश आणि हरियाणामधील असल्याचा पोलिसांना संशय आहे. यूपीच्या आरोपीवर ६ गंभीर गुन्हे तर हरियाणाच्या आरोपींवर १३ खुनाचे गुन्हे दाखल आहेत.

काय आहे प्रकरण?

बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची राहत्या घरासमोर हत्या करण्यात आली. मोटारसायकलवरुन आलेल्या दोन अज्ञात तरुणांनी संजय बियाणी यांची गोळी घालून हत्या केली. यामध्ये त्यांच्या वाहन चालकालाही गोळी लागल्यामुळे गंभीर जखमी झाला होता. संजय बियाणी यांना गंभीर जखमी असताना रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेतील हल्लेखोरांना पकडण्याची मागणी जोर धरु लागली होती. हे प्रकरण सीबीआय़कडे देण्यात यावा अशी मागणी बियाणींच्या कुटुंबीयांनी केली होती. परंतु पोलिसांनी ७ जणांना ताब्यात घेतलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा : National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधींना ईडीचे समन्स, ८ जूनला चौकशीला हजर राहण्याचे आदेश

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -