घरताज्या घडामोडीकरोना व्हायरस : आता संजय गांधी राष्ट्रीय उद्यानही बंद

करोना व्हायरस : आता संजय गांधी राष्ट्रीय उद्यानही बंद

Subscribe

आता बोरीवली पूर्वेकडील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान ही बंद ठेवण्याचा निर्णय महाराष्ट्र वनविभागाने घेतला आहे.

करोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी मुंबईतल्या सावर्जनिक ठिकाणी गर्दी करू नका, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. त्याअनुषंगाने मुंबईतली धार्मिक स्थळे, पर्यटन स्थळं, सिनेमागृहे, जीम, मॉल्स, शाळा, महाविद्यालये पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचसोबत आता बोरीवली पूर्वेकडील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान ही बंद ठेवण्याचा निर्णय महाराष्ट्र वनविभागाने घेतला आहे. यासंदर्भातले एक पत्र संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे मुख्य वनसंरक्षक व संचालक यांनी जाहिर केले आहे.

सर्व पर्यटकांना सुचित करण्यात येते की, राज्य शासनाने करोना विषाणूंना प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ नुसार १३ मार्च पासून लागू करून खंड २, ३ व ४ मधील तरतूदींचीं अंमलबजावणी यादी अधिसुचना निर्गमित केली आहे. त्यानूसार १७ ते ३१ मार्च पर्यंत संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे सर्व पर्यटकांसाठी व प्रभातफेरीसाठी येणाऱ्या नागरिकांसाठी बंद ठेवण्यात येत आहे, अशी जाहीर सुचना उद्यान प्रशासनाकडून करण्यात आली आहे.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये दररोज हजारोंच्या संख्येने पर्यटक येत असतात. त्यामुळे गर्दी टाळावी, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या ठिकाणी लोकांची गर्दी होते. तिथे करोनाचा संसर्ग जास्त होण्याची शक्यता असते. म्हणून नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होवू नये. त्यासाठी पुढील १५ दिवस हे महत्त्वाचे असून नागरिकांनी घरी राहूनच तब्बेतीची काळजी घ्यावी. जसजसे करोनाचे सावट कमी होईल. त्याप्रमाणे पर्यटकांसाठी उद्यान खुले केले जाईल.
– सुनील लिमये, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (पश्चिम विभाग)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -