mlc bypoll election: भाजपच्या संजय केणेकरांचा अर्ज मागे, डॉ. प्रज्ञा सातव यांची होणार बिनविरोध निवड

sanjay kenekar application back congress leader pradnya satav elected an unopposed at mlc
mlc bypoll election: भाजपच्या संजय केणेकरांचा अर्ज मागे, डॉ. प्रज्ञा सातव यांची होणार बिनविरोध निवड

भाजपकडून विधानपरिषद पोटनिवडणुकीसाठी औरंगाबाद भाजप अध्यक्ष संजय केणेकर यांना उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र संजय केणेकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. यामुळे आता काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांची आमदारकीचा मार्ग मोकळा झाला आहे. काँग्रेस नेते शरद रणपिसे यांच्या निधनानंतर विधानपरिषदेची जागा रिक्त होती. या जागेवर पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली होती. काँग्रेसची जागा असल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी काँग्रेसच्या शिष्ट मंडळाने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. अखेर भाजपच्या उमेदवाराने विधानभवनात जाऊन अर्ज मागे घेतला असल्यामुळे प्रज्ञा सातव यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.

काँग्रेस नेते शरद रणपिसे यांचे निधन झाले त्यानंतर विधानपरिषदेची एक जागा रिक्त झाली होती. या जागेवरील आमदारीकीची मुदत ही २०२४ पर्यंत असल्यामुळे आगामी सदस्याला पुर्णवेळ काम करण्याची संधी मिळणार आहे. ही जागा काँग्रेसची असल्यामुळे बिनविरोध निवड निश्चित होती. दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली आहे. केणेकर यांनी सोमवारी अर्ज मागे घेतला असल्यामुळे ही निवडणूक आता बिनविरोध होणार आहे.

भाजप नेते संजय केणेकर मुंबईत दाखल झाले होते. केणेकरांनी विधान भवन येथे जाऊन आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. संजय केणेकर यांना अर्ज मागे घेण्याची सूचना पक्ष श्रेष्ठींनी दिली असल्याचे सांगण्यात येत आहे.

काँग्रेस नेत्यांनी घेतली होती फडणीसांची भेट

महाराष्ट्रात पंरपरा आहे की, जर एखाद्या संवैधानिक पदावरील लोकप्रतिनिधीचं निधन झालं आणि पद रिक्त झाले तर त्या पदावरील निवडणूक बिनविरोध करण्यात येते. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. यामध्ये काँग्रेस नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. यावेळी काँग्रेसकडून बिनविरोध निवडणूक करण्याची विनंती केली होती. लोकसभेच्या जागेनंतर आता भाजपकडून विधानपरिषदेच्या जागेवरही महाराष्ट्राची परंपरा पाळली आहे.


हेही वाचा : शरद पवार, अजित पवार आणि परब यांच्यात गुप्त बैठक; एसटी संपावर तोडगा निघणार?