घरताज्या घडामोडीMERC चे नवे अध्यक्ष संजय कुमार 

MERC चे नवे अध्यक्ष संजय कुमार 

Subscribe

MERC अध्यक्षपदावर वर्णी लागावी म्हणून संजय कुमार यांनी मुख्य सचिव पदावर मुदतवाढ नाकारली होती. 

महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाच्या (MERC) अध्यक्षपदी अखेर माजी मुख्य सचिव संजय कुमार यांच्या नियुक्तीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी शिक्कामोर्तब केले. संजय कुमार हे २८ फेब्रुवारी रोजी मुख्य सचिव पदावरून निवृत्त झाले आणि त्यांना चार दिवसांत नवी जबाबदारी देत मुख्यमंत्री ठाकरे यांनी त्यांना MERC वर पाठवले. संजय कुमार यांची निवृत्तीनंतर पुढील पाच वर्षे वयाच्या ६५ वर्षापर्यंत MERC वर नियुक्ती करत ठाकरे सरकारने त्यांची सोय केल्याची चर्चा गुरुवारी विधानभवनात सुरु होती. MERC अध्यक्षपदावर वर्णी लागावी म्हणून संजय कुमार यांनी मुख्य सचिव पदावर मुदतवाढ नाकारली होती.

MERC चे अध्यक्ष आनंद कुलकर्णी यांचा कार्यकाळ ४ जानेवारी २०२१ रोजी संपला होता. मात्र, त्यावेळी संजय कुमार हे मुख्य सचिवपदी विराजमान होते. २८ फेब्रुवारी रोजी निवृत्त झाल्यानंतर संजय कुमार हे पुढील पाच वर्षे MERC चे अध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत. १९८४ च्या बॅचचे असलेले संजय कुमार यांनी यापूर्वी महिला बालकल्याण, गृहनिर्माण आणि गृह विभागात काम केलेले आहे. सध्या MERC मध्ये सदस्य म्हणून माजी सनदी अधिकारी मुकेश खुल्लर हे कार्यरत आहेत.

- Advertisement -

यापूर्वी माजी मुख्य सचिव अजोय मेहता यांचीही महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाच्या (महारेरा) अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. मेहता यांनाही निवृत्तीनंतर दोन वेळा मुदत वाढ आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रधान सल्लागार अशा पदावर नेमले होते.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -