घरताज्या घडामोडीSanjay Nirupam : काँग्रेस नेते संजय निरूपम यांची सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी

Sanjay Nirupam : काँग्रेस नेते संजय निरूपम यांची सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी

Subscribe

काँग्रेस नेते संजय निरूपम यांची पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली आहे. सातत्याने पक्षविरोधी भूमिका आणि वक्तव्यांची दखल घेत पक्षाध्यशांनी संजय निरुपम यांची काँग्रेस पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती के. सी. वेणुगोपाल यांनी पत्रद्वारे दिली.

मुंबई : काँग्रेस नेते संजय निरूपम यांची पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली आहे. सातत्याने पक्षविरोधी भूमिका आणि वक्तव्यांची दखल घेत पक्षाध्यशांनी संजय निरुपम यांची काँग्रेस पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती के. सी. वेणुगोपाल यांनी पत्रद्वारे दिली. (sanjay nirupam congress president has approved the expulsion of sanjay nirupam from the party for six years)

संजय निरुपम यांना काँग्रेसच्या तिकीटावर उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघावर निवडणूक लढवण्याची तीव्र इच्छा आहे. पण या जागेवर ठाकरे गटाकडून उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे. ठाकरे गटाने या जागेतून अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी दिली आहे. पण संजय निरुपम यांनी उघडपणे ठाकरे गटाच्या उमेदवाराला विरोध केला आहे. अमोल कीर्तिकर यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. त्यांच्यावर खिचडी घोटाळ्याचे आरोप आहेत. त्यामुळे आपण कीर्तिकर यांच्यासाठी प्रचार करणार नाही, अशी भूमिका निरुपम यांनी घेतली.

- Advertisement -

काँग्रेसच्या पक्षाध्यशांकडून केलेल्या कारवाईपूर्वी संजय निरूपम यांनी ट्वीट करत काँग्रेसवर टीका केली होती. “काँग्रेस पक्षाने माझ्यासाठी जास्त ऊर्जा आणि स्टेशनरी वाया घालवू नये. त्याऐवजी, पक्ष वाचवण्यासाठी तुमची उरलेली ऊर्जा आणि स्टेशनरी वापरा. तसही पक्ष सध्या गंभीर आर्थिक संकटातून जात आहे. मी दिलेला एक आठवड्याचा कालावधी आज पूर्ण झाला आहे. उद्या मी स्वतः निर्णय घेईन”, असे म्हणत काँग्रेस नेते संजय निरूपम यांनी पक्षावरच टीका केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Shiv Sena : हिंगोलीत उमेदवार बदलण्याची शिंदेंवर नामुष्की; भावना गवळींनाही नाकारली उमेदवारी

दरम्यान, संजय निरुपम यांची पक्षातूल सहा वर्षांसाठी हकालपट्टी केल्यानंतर संजय निरुपम यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटचा डीपी बदलला आहे. याआधी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासोबत त्यांचा फोटो होता. मात्र आता त्यांना स्वत:चाच फोटो डीपी म्हणून ठेवला आहे. यावरून संजय निरुपम यांची पक्षावरील नाराजी स्पष्ट होते.

नेमके प्रकरण काय?

संजय निरुपम यांना पार्टीतून बडतर्फ करण्याचा प्रस्ताव आजच्या काँग्रेसच्या बैठकीत घेण्यात आला आहे. तसेच काँग्रेसकडून संजय निरुपम यांचं नाव स्टार प्रचारक यादीतून देखील हटवण्यात आलं आहे. महाराष्ट्र काँग्रेसने संजय निरुपम यांच्या बडतर्फचा प्रस्ताव आता दिल्ली हायकमांडला पाठवला आहे. त्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संजय निरुपम यांचे नाव काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीतून काढून टाकल्याची माहिती दिली.


हेही वाचा – Congress News : तुमची ऊर्जा, स्टेशनरी पक्ष वाचवण्यासाठी वापरा; संजय निरुपमांचा काँग्रेसला खोचक टोला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -