गृहनिर्माण संस्थांमधील तक्रारी निवरणासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात स्वतंत्र इन्स्पेक्टर – संजय पांडे

Sanjay Pandey announces appointment of independent inspector in police station for complaints of residents of housing society
Sanjay Pandey announces appointment of independent inspector in police station for complaints of residents of housing society

मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी फेसबुक LIVE करत एक महत्वाची घोषणा केली आहे. मुंबईतील गृहनिर्माण संस्थांमधील रहिवाशांच्या तक्रारी दाखल करुन घेण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात एक स्वतंत्र इन्स्पेक्टर असेल, अशी घोषणा संजय पाडे यांनी केली आहे. याशिवाय मुंबईकरांसाठी सिटीझन फोरम स्थापन करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे.

घाटकोपर येथील गृहनिर्माण संस्थामधील रहिवाशांनी पोलीस ठाण्यात संस्थेच्या अध्यक्षाविरोधात तक्रार केली होती. या तक्रारीनंतर संजय पांडे यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. घाटकोपरमधील म्हाडाच्या गृहनिर्माण संस्थेंच्या अध्यक्षानं बैठकीच्या इतिवृत्तात फेरफार केल्याची तक्रार रहिवाशांनी केली होती. या तक्रारीत गृहनिर्माण संस्थेच्या अध्यक्षानं इतिवृत्तामध्ये फेरफार करत रहिवाशांबद्दल अपशब्दांचा वापर केल्याचे म्हटले आहे.

मुंबई पोलीसांचे 12 विभाग आणि 5 उपविभाग असतील. यावर सिटीझन फोरमची एक वेबसाइड तयारकरण्यात आली आहे. या वेबसाईडला mumbaicf.in भेट देऊन सूचना कळवाव्यात, असे संजय पांडे यांनी म्हटले आहे. सिटीझन फोरमची पहिली बैठक १८ मे रोजी सायंकाळी ६ ते ७ या वेळेत होणार आहे. पहिली बैठक मुंबई पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात होणार असून पुढील बैठका सिटीझन फोरमच्या सदस्यांनी घ्याव्यात, असे संजय पांडे यांनी म्हंटले आहे.