Saturday, May 15, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी संजय पांडे राज्याचे नवे पोलीस महासंचालक

संजय पांडे राज्याचे नवे पोलीस महासंचालक

Related Story

- Advertisement -

राज्यातील सर्वात ज्येष्ठ आयपीएस अधिकारी संजय पांडे यांची शुक्रवारी रात्री उशीरा राज्याचे पोलीस महासंचालकपदी नियुक्ती केली आहे. सध्या पांडे यांच्याकडे पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त पदभार असून त्यांच्याकडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचा पदभार सुद्धा असणार आहे. महाराष्ट्र राज्य सुरक्षा दलाच्या संचालक पदाचा कार्यभार सुद्धा असणार आहे.

संजय पांडे हे १९८६ च्या बॅचचे पोलीस अधिकारी असून सध्या त्यांच्याकडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा दलाचा कार्यभार देण्यात आला होता. मात्र त्यांनी पदभार स्वीकारण्यास नकार देत सुट्टीवर जाण्याचा अर्ज केला होता. मात्र, आता अत्यंत प्रामाणिक अधिकारी असलेले संजय पांडे यांना ठाकरे सरकारने योग्य तो न्याय दिला आहे. सध्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक रजनीश शेठ यांच्याकडे महासंचालक पदाचा अतिरिक्त पदभार होता. मात्र, शुक्रवारी राज्याच्या गृह विभागाने नवा आदेश काढत महासंचालक व पोलीस महानिरीक्षक, महाराष्ट्र राज्य या पदाचा अतिरिक्त कार्यभार संजय पांडे यांच्याकडे सोपविला आहे. यापूर्वी संजय पांडे यांनी मुंबईत पोलोस उपायुक्त, होमगार्डचे अतिरिक्त पोलीस महासंचालक, होमगार्डचे महासंचालक पदी काम केले आहे.

- Advertisement -

- Advertisement -