घरमहाराष्ट्रकट्टर शिवसैनिकाला राज्यसभेची उमेदवारी, जाणून घेऊया संजय पवार यांचा राजकीय प्रवास

कट्टर शिवसैनिकाला राज्यसभेची उमेदवारी, जाणून घेऊया संजय पवार यांचा राजकीय प्रवास

Subscribe

शिवसेनेने राज्यसभेच्या दुसऱ्या जागेसाठी संजय पवारांचे (Sanjay Pawar) नाव निश्चीत केले आहे. धक्कातंत्राचे राजकराण करत पवार यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. संजय पवार हे कोल्हापूर शिवसेनेच्या (Shiv Sena) जिल्हा प्रमुख पदावर काम करत आहेत. जाणून घेऊया कोण आहेत संजय पवार

तीन वेळा नगरसेवक –

- Advertisement -

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार (Shiv Sena) हे कट्टर शिवसैनिक म्हणून परिचित आहेत. ३३ वर्षापूर्वी म्हणजे १९८९ ला त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर तीन वेळा ते कोल्हापूर (Kolhapur) महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. एकदा त्यांना कोल्हापूर महापालिकेत विरोधी पक्षनेते म्हणूनही संधी मिळाली आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्नावर लढणारा नगरसेवक अशी त्यांची महापालिकेत ओळख होती. यामुळे पवार हे तीन वेळा तीन वेगवेगळ्या प्रभागातून निवडून आले आहेत. शहराच्या सर्वच प्रश्नावर आंदोलन करण्यात त्यांचा नेहमीच पुढाकार असतो.

हेही वाचा –  राज्यसभेसाठी शिवसेनेकडून संजय पवारांना उमेदवारी, मुख्यमंत्र्यांकडून लवकरच अधिकृत घोषणा – संजय राऊत

- Advertisement -

14 वर्ष जिल्हा प्रमुख –

संजय पवारांचे नाव गेले २० वर्षे कोल्हापूर शहर विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक उमेदवार म्हणून घेतले जाते. मात्र, प्रत्यक्षात त्यांना संधी मिळाली नाही. सुरेश साळोखे आणि राजेश क्षीरसागर यांना उमेदवारी मिळाली आणि ते दोघे दोन वेळा निवडून आले आहेत. यामुळे पवारांना आमदार होता आले नाही. करवीर तालुका प्रमुख आणि चार वर्षे शहरप्रमुखपदी त्यांनी काम केले आहे. संजय पवार १४ वर्षे जिल्हाप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. युतीचे सरकार असताना आण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाचे उपाध्यक्षपदीही त्यांना देण्यात आले होते.

हेही वाचा – मुख्यमंत्री छत्रपती घराण्याचा सन्मान करतील असा विश्वास, राज्यसभा उमेदवारीवर संभाजीराजेंची पहिली प्रतिक्रिया

दरम्यान, राज्यसभेसाठी आपल्या नावाचा विचार होत असल्याचे बातमी कळाली. मनाला अतिशय आनंद झाला. सामान्य शिवसैनिकाला एवढे मोठे पद देण्याचा विचार होत असल्याने पक्षाविषयी असलेला आदर आणखी वाढला आहे, अशी प्रतिक्रिया संजय पवार यांनी दिली आहे.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -