घरमहाराष्ट्रनाशिकराजकारण हा माझा व्यवसाय नाही : संजय राठोड

राजकारण हा माझा व्यवसाय नाही : संजय राठोड

Subscribe

नांदगांव दौऱ्यात माजी मंत्री संजय राठोड यांचे प्रतिपादन, बंजारा भाषेतच केले भाषण

राजकारण हा माझा व्यवसाय नाही, ज्या समाजातून मी आलोय त्या समाजाचं मी देणं लागतो, म्हणून माझं सामाजिक कार्य सुरू आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री संजय राठोड यांनी केलं.

नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथे आयोजित बंजारा समाजाच्या मेळाव्यात ते बोलत होते. राठोड पुढे म्हणाले की, माझ्यावर आरोप झाल्यानंतर मी स्वतःहून राजीनामा दिला. माझा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत वाचून दाखवला. बहुदा एखाद्या मंत्र्याचा राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्र्याने तो वाचून दाखवावा ही पहिली वेळ असावी. त्यामुळे माझ्यावर मुख्यमंत्र्यांचं असलेलं प्रेम अधोरेखित झालंय. त्यांनी संधी दिल्यास तर पुन्हा मंत्रिपद स्वीकारेन, असं प्रतिपादनही त्यांनी केलं. मंत्रीपदाच्या दबावासाठी नव्हे तर ऑल इंडिया बंजारा सेवा संघ या समाज संघटनेच्या माध्यमातून राज्यभर बंजारा समाज बांधवांशी संवाद साधून समाजाच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी हा दौरा सुरू असल्याचंही राठोड यांनी सांगितलं. राठोड यांच्या या दौऱ्यात बंजारा समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते. मेळाव्याला संबोधित करताना राठोड यांनी संपूर्ण भाषण त्यांनी बंजारा भाषेतच केलं.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -