Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी संजय राठोडांनी राजीनाम्यावर दिलं स्पष्टीकरण, म्हणाले....

संजय राठोडांनी राजीनाम्यावर दिलं स्पष्टीकरण, म्हणाले….

Related Story

- Advertisement -

तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांनी आपल्या राजीनाम्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. पुण्यातल्या तरुणीच्या आत्महत्येनंतर ठाकरे सरकारमधील माजी वनमंत्री संजय राठोड यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आता संजय राठोड यांनी राजीनामा देण्याबाबत स्पष्टीकरण देत म्हणाले की, ‘मंत्री पदाचा राजीनामा देण्यासाठी माझ्यावर कोणाचा दबाव नव्हता. परंतु शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रतिमा मलिन होणार नाही याची दक्षता घेऊन मी स्वतःहून राजीनामा दिला आहे.’

काही महिन्यांपूर्वी बीड जिल्ह्यातील पूजा चव्हाण तरुणीच्या आत्महत्या प्रकरणामुळे राजकारण चांगलंच तापलं होतं. या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांचं नाव आलं. त्यानंतर भाजपने संजय राठोड यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली. तसेच विधिमंडळाच्या अधिवेशनात भाजप याप्रकरणावरून हंगामा घातला. राठोड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करून अधिवेशनात कामकाज चालू न देण्याचा इशारा दिला होता. अखेर राठोड यांनी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत मंत्रीपदाचा राजीनामा दिला. यावेळी मंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थितीत होते.

- Advertisement -

संजय राठोड यांनी राजीनामा दिल्यानंतर सोलापूरमधील आयोजित केलेल्या सभेत याचे स्पष्टीकरण दिले आहे. संजय राठोड म्हणाले की, ‘मी स्वतः राजीनामा दिला आहे. माझ्यावर आरोप झाले, अधिवेशन चालू देणार नाही असं म्हटलं गेलं. मी ज्या पक्षात आहे, माझे नेते म्हणून उद्धव ठाकरे माझे साहेब आहेत. त्याची प्रतिमा स्वच्छ काम करणारी आहे. एवढं मन लावून प्रामाणिक, एकनिष्ठेने ते काम करत आहेत. मला असं वाटलं आरोप झाले ठिक आहे. जे होईल ते पाहूया, मी बाजूला राहतो, तुम्ही चौकशी करा.’


हेही वाचा – ओबीसी आरक्षणावर आज मंत्रिमंडळाची बैठक, छगन भुजबळ यांची माहिती


- Advertisement -

 

- Advertisement -