घरताज्या घडामोडीसंजय राठोड यांना क्लीनचिट मिळाल्याने मंत्रिमडळात स्थान, मुख्यमंत्र्यांनी केले स्पष्ट

संजय राठोड यांना क्लीनचिट मिळाल्याने मंत्रिमडळात स्थान, मुख्यमंत्र्यांनी केले स्पष्ट

Subscribe

यवतमाळमधील शिवसेना नेते आणि बंजारा समाजाचे नेते संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी शिंदे सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र संजय राठोड यांना मंत्रिमंडळात स्थान दिल्याने भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला आहे.

मुंबई : यवतमाळमधील शिवसेना नेते आणि बंजारा समाजाचे नेते संजय राठोड यांनी शिंदे सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र संजय राठोड यांना मंत्रिमंडळात स्थान दिल्याने भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच, ‘पुजा चव्हाण हीच्या मृत्युला कारणीभूत असणाऱ्या माजी मंत्री संजय राठोड यांना पुन्हा मंत्रीपद दिले जाणे हे अत्यंत दुदैवी आहे’, असे त्यांनी म्हटले. यावर राज्याचे मुख्यमंत्री यांनी पोलिसांनी संजय राठोड यांना त्या प्रकरणाच क्लीनचिठ दिल्याने मंत्रिमंडळात स्थान दिल्याचे म्हटले. (Sanjay Rathod position in the cabinet after getting a clean chit the Chief Minister clarified)

शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बातचित केली. त्यावेळी “महाविकास आघाडी सरकारमध्ये पोलिसांनी संजय राठोड यांना त्या प्रकरणाच क्लीनचिठ दिली होती. त्यामुळे त्यांचे राठोड यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. त्यावर आणखी कोणाचे काही मत अथवा सागणे असेल, ते नक्की ऐकून घेतले जाईल”, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले.”लोकशाहीमध्ये प्रत्येकाला भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे”, असे चित्रा वाघ यांच्या टीकेनंतर एकनाथ शिंदे यांनी म्हटले. याशिवाय “पोलिसांनी त्यावेळी या प्रकरणाचा तपास केला होता. त्या तपासामध्ये काही निष्पन्न झाले नाही. त्यामुळे त्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे”, असेही एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

- Advertisement -

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी संजय राठोड यांना आज राजभवनात आयोजित करण्यात आलेल्या शपथविधीच्या सोहळ्यात गोपनियतेची शपथ दिली. त्यामुळे राठोड आता फडणवीस आणि चंदकांत पाटील यांच्यासोबत मंत्रीमंडळात दिसणार आहे.

पुजा चव्हाण प्रकरण काय?

- Advertisement -

बीड जिल्ह्यातील पुजा चव्हाण (22) या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणी मंत्री संजय राठोड हे संशयाच्या भोवऱ्यात सापडले होते. पुजा चव्हाण ही त्यावेळी अभ्यासासाठी पुण्याला रहायला आली होती. इंग्लिश स्पीकिंगचा कोर्स करण्यासाठी ती भाऊ आणि मित्रासोबत राहत होती. ती पुण्यातील वानवडी येथील हेवन पार्क सोसायटीत राहत होती. तसेच, सोशल मीडियात विशेषत: टिकटॉक अॅपमुळे ती प्रचंड लोकप्रिय झाली होती.

त्यानंतर 7 फेब्रुवारीच्या रात्री तिने पुण्यातील इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. या प्रकरणी वानवडी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली होती. त्यानंतर काही दिवसांतच या प्रकरणाशी विदर्भातील एका कॅबिनेट मंत्री म्हणजेच संजय राठोड यांचा संबंध असल्याचे वृत्त समोर आले होते. त्यानंतर पुजा चव्हाणच्या आत्महत्याप्रकरणी गेले वर्षभर चोहीकडून होणारे आरोप त्यांच्यावर केले जात होते. त्यामुळे ठाकरे सरकारमध्ये असताना वनमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.


हेही वाचा –  शिंदे – फडणवीस मंत्रिमंडळाचा विस्तार : 18 जणांना राज्यपालांनी दिली शपथ

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -