घरमहाराष्ट्रमंत्रिपदाचा निर्णय मुख्यमंत्री घेतील; संजय राठोड आशावादी

मंत्रिपदाचा निर्णय मुख्यमंत्री घेतील; संजय राठोड आशावादी

Subscribe

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात शिवसेना नेते आणि माजी वनमंत्री संजय राठोड यांना पुणे पोलिसांनी क्लिीनचिट दिल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणात नाव आल्याने राठोड यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. दरम्यान, आता संजय राठोड यांच्या मंत्रिपदाबाबत चर्चा सुरु झाली आहे. तसंच, मंत्रिपदासाठी संजय राठोड आशावादी असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. संजय राठोड हे जळगाव दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना मंत्रिपदाबाबत प्रश्न विचारला असता उद्धव ठाकरे अंतिम निर्णय घेतील, असं राठोड म्हणाले.

पुजा चव्हाण मृत्यू प्रकरणात संजय राठोड यांना पुणे पोलिसांनी क्लीनचिट दिल्याची चर्चा आहे. यामुळे राठोड यांचं मंत्रिमंडळात पुनरागमन होईल अशा चर्चा जोर धरु लागल्या आहेत. त्यात आता त्यांनी मंत्रिपदाबाबत भाष्य केलं आहे. माझ्या मंत्रिपदाबाबत विरोधकांनी कितीही विरोध केला तरी अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील, असं संजय राठोड यांनी म्हटलं आहे. संजय राठोड हे रस्त्यावर उतरत विविध भागांचा दौरा करत आहेत. वाड्या-वस्त्या-तांड्यावर जाऊन समाज बांधवांशी चर्चा करीत आहेत. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात तुम्हाला क्लीन चीट दिली असल्याचे बोललं जात आहे, या प्रश्नावर बोलताना राठोड यांनी सांगितलं की “या बाबत आपण एकदा बोललो आहोत, या प्रकरणी पोलीस चौकशी सुरू आहे, योग्य वेळ येईल तेव्हा आपण बोलणार आहोत,” असं ते म्हणाले.

- Advertisement -

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात राठोड यांचं नाव आल्याने मोठा गदारोळ उडाला होता. विरोधी पक्षांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह सरकारला लक्ष्य केलं होतं. विरोधकांकडून राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरण्यात आली होती. यामुळे नाईलाजाने कोणत्याही चौकशीविना मुख्यमंत्री ठाकरेंना राठोड यांचा राजीनामा घ्यावा लागला होता. आता पूजा चव्हाणच्या आई-वडिलांच्या जबाबात राठोड यांना क्लिनचिट दिल्याने मुख्यमंत्री मंत्रिमंडळात घेणार का? हे पाहावं लागेल.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -