आतापर्यंत शांत होतो, यापुढे कायदेशीर नोटीस देणार; संजय राठोडांचा चित्रा वाघ यांना इशारा

बच्चू कडू नाराज असले तरीही मंत्रिमंडळाचा छोटा विस्तार झाला आहे. पावसाळी अधिवेशनानंतर पुढचा विस्तार करण्यात येईल, असं संजय राठोड म्हणाले. 

bjp chitra wagh slams sanjay rathod minister oath in maharashtra cabinet expansion 2022 cm eknath shinde dcm devendra fadnavis government

पूजा चव्हाण प्रकरणात पोलीस चौकशी झाली आहे. या प्रकरणात मी दोषी नसल्याचं सिद्ध झालं आहे. पोलिसांनीही त्याबाबत लिहून दिले आहे. त्यामुळे आतापर्यंत मी शांत होतो. परंतु यापुढे शांत राहणार नाही. यापुढे कायदेशीर नोटीस देणार आहे, असा इशाराच संजय राठोड यांनी चित्रा वाघ यांना दिला आहे. संजय राठोड यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाल्याने चित्रा वाघ यांनी हल्लोबल केला होता. पूजा चव्हाण प्रकरणात संजय राठोड यांची चौकशी सुरू असातनाही त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळल्याने चित्रा वाघ संतापल्या होत्या. त्यावर प्रत्तुत्तर म्हणून राठोडांनी इशारा दिला आहे. (Sanjay rathod warned to chitra wagh about pooja chavan suicide case)

हेही वाचा – शिंदे-फडणवीस सरकारचे तीन मोठे निर्णय, मुंबई मेट्रो 3 च्या सुधारित प्रस्तावास मान्यता

आज मंत्रिमंडळ बैठक झाली. बैठकीनंतर संजय राठोडांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सरकारमध्ये कोणाचीच नाराजी नसल्याचं स्पष्ट केलं. आम्ही सर्व शिवसेनेचे ४० आमदार आणि अपक्ष १० आमदार आमच्यात एकोपा आहे. एकनाथ शिंदे यांचा सर्वांसोबत संपर्क आहे, असं संजय राठोड म्हणाले.

बच्चू कडू नाराज असले तरीही मंत्रिमंडळाचा छोटा विस्तार झाला आहे. पावसाळी अधिवेशनानंतर पुढचा विस्तार करण्यात येईल, असं संजय राठोड म्हणाले.

हेही वाचा – राज्यातील सत्ता संघर्षाची सुनावणी 10 दिवस पुढे ढकलली, आता 22 ऑगस्टला होणार सुनावणी

पूजा राठोड प्रकरणात ते म्हणाले की, मी आतापर्यंत चारवेळा निवडून आलेलो आहे. मी काहीतरी चांगलं काम करतो म्हणून लोक मला निवडून देतात. मी ज्या समाजातून मी येतो त्या समाजातील लोकांची माझ्याकडून अपेक्षा आहे. पूजा चव्हाण प्रकरणात माझी पोलीस चौकशी झाली, न्यायालनयीन चौकशी झाली. यातून मी या प्रकरणात दोषी नसल्याचं सिद्ध झालं आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी मला पुन्हा संधी दिली आहे. मला समाजासाठी काम करण्यची इच्छा आहे, असंही ते पुढे म्हणाले.