घरताज्या घडामोडीसंजय राठोडांचा पाय खोलात, तक्रारदार महिला पोहचली पोलीस ठाण्यात

संजय राठोडांचा पाय खोलात, तक्रारदार महिला पोहचली पोलीस ठाण्यात

Subscribe

एका महिलेने संजय राठोड यांनी आपल्याकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा  गंभीर आरोप केल्याने संजय राठोड पुन्हा अडचणीत आले आहेत.

पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणामुळे मंत्रीपद गमवावे लागलेले शिवसेना नेते आणि माजी मंत्री संजय राठोड यांच्या मागे लागलेली शुक्लकाष्ठ संपता संपत नाहीयेत. एका महिलेने संजय राठोड यांनी आपल्याकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा  गंभीर आरोप केल्याने संजय राठोड पुन्हा अडचणीत आले आहेत.  ही महिला आज शनिवारी घाटंजी पोलीस ठाण्यात जबाब नोंदवण्यासाठी आली होती.

संबधित महिलेने यवतमाळ येथील पोलीस अधिक्षकांना पत्र पाठवले आहे. त्यात तिने संजय राठोड यांनी पतीला नोकरीवर ठेवण्याच्या मोबदल्यात आपल्याकडे शरीरसुखाची मागणी केली आणि आपला शारीरिक व मानसिक छळ केला असे गंभीर आरोप तिने केले आहेत. शनिवारी ही महिला आपल्या कुटुंबीयासह घाटंजी पोलीस ठाण्यात आली होती. यावेळी तिचा जबाब घेण्यात आला. याप्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक तयार करण्यात आले आहे.

- Advertisement -

तर दुसरीकडे संजय राठोड यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली. कोणीतरी माझी राजकीय कारकीर्द संपवण्यासाठी जाणूबुजून मला या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न करत असल्याचे राठोड यांनी म्हटले . तसेच त्यांनी महिलेने केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. दरम्यान, याप्रकरणात विशेष तपास पथक काय करते याकडे राजकारण्यांचे लक्ष लागले आहे.

 

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -