Tuesday, February 23, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र संजय राठोड पोहरादेवीला येणार, मंदिराच्या परिसरात फौजफाटा तैनात

संजय राठोड पोहरादेवीला येणार, मंदिराच्या परिसरात फौजफाटा तैनात

असा असेल संजय राठोड यांचा दौरा

Related Story

- Advertisement -

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे चर्चेत असलेले वनमंत्री संजय राठोड मागील १५ दिवसांपासून गायब होते. परंतु तब्बल १५ दिवसांनतर वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड घरी दाखल झाले आहेत. मंत्री संजय राठोड यांच्या घराबाहेर कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे. पूजा चव्हाणने ८ फेब्रुवारीला आत्महत्या केली यानंतर संजय राठोड यांचे नाव चर्चेत आले होते. परंतु मागील १५ दिवसांपासून वनमंत्री संजय राठोड बेपत्ता होते. अखेर ते आज (मंगळवार, २३ फेब्रुवारी) पोहरादेवी मंदिरात हजहजर राहणार आहेत. वनमंत्री संजय राठोड पोहरादेवी मंदिरात हजर राहणार असल्यामुळे मंदिर परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. रस्त्यावर बॅरिकेट लावले असून बॉम्ब नाशक पथकही मंदिर परिसरात दाखल झाले आहेत.

पोहरादेवी परिसरात मोठी गर्दी होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने चोख व्यवस्था केली आहे. वनमंत्री संजय राठोड यांच्या घराबाहेर त्यांचे शासकीय वाहनही उभे कऱण्यात आले आहे. वनमंत्री संजय राठोड पोहरादेवीत शक्तीप्रदर्शन करणार असल्याचे म्हटले जात आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे पोहरादेवी संस्थानाला नोटीस बजावण्यात आली आहे. पोहरादेवी परिसरात मोठी गर्दी होऊ नये यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त केला आहे. मंदिरात ५० जाणांच्या उपस्थितीची परवानगी देण्यात आली आहे.

- Advertisement -

पोहरादेवी परिसरात सुरक्षेच्या कारणांमुळे प्रत्येक मार्गावर तपासणी केली जात आहे. प्रत्येक वाहनांची झाडाझडती केली जात आहे. वनमंत्री संजय राठोड यवतमाळच्या घरी दाखल झाले असून ११ वाजताच्या सुमारास पोहरादेवीमध्ये दाखल होणार आहेत. वनमंत्री संजय राठोड १५ दिवसानंतर येत असल्यामुळे समर्थकांनी जय्यत तयारीही केली आहे.

असा असेल संजय राठोड यांचा दौरा

सकाळी ९ वाजता : वाशिमच्या मानोरा तालुक्यातील श्री क्षेत्र पोहरागडकडे रवाना होतील
सकाळी ११.३० वा. श्री क्षेत्र पोहरागड इथे आगमन आणि दर्शन करतील
दुपारी १ वा. दारव्हा तालुक्यातील श्री क्षेत्र मुंगसाजी महाराज संस्थान धामनगाव देवकडे रवाना होणार
दुपारी २.३० वा. श्री क्षेत्र मुंगसाजी महाराज संस्थान धामनगाव देव इथे आगमन आणि दर्शन
दुपारी ३.३०वा. यवतमाळच्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना होणार
दुपारी ४.३० वा. जिल्हाधिकारी कार्यालयात आगमन, यवतमाळ जिल्ह्यातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बैठक घेणार

- Advertisement -