Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रसंजय राऊत घेणार राष्ट्रपतींची भेट; 'या' मुद्यांवर करणार चर्चा

संजय राऊत घेणार राष्ट्रपतींची भेट; ‘या’ मुद्यांवर करणार चर्चा

Subscribe

संजय राऊत म्हणाले की, राज्यात सुरू असलेली परिस्थिती, भविष्यात उडणारा भडका यावर आज आम्ही उद्धव ठाकरे यांच्या सुचनेने राष्ट्रपतींची भेट घेत आहोत. फक्त खासदार नाही तर आमदारदेखील या शिष्टमंडळात असतील. सर्वसमावेशक शिष्टमंडळ आज भेट घेईल.

नवी दिल्ली: राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. यावरून आता ओबीसी समाजही रस्त्यावर उतरला आहे. यावरून आता ठाकरे गटही अॅक्शन मोडवर आल्याचं दिसत आहे. ठाकरे गटाचे खासदार आणि नेते संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितलं की मराठा आणि धनगर आरक्षणासंदर्भात त्यांच्या पक्षाचं शिष्टमंडळ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार आहेत.  (Sanjay Raut A delegation of the Thackeray group will meet the President Draupadi Murmu Maratha and Dhangar reservation will be made in this visit)

संजय राऊत म्हणाले की, राज्यात सुरू असलेली परिस्थिती, भविष्यात उडणारा भडका यावर आज आम्ही उद्धव ठाकरे यांच्या सुचनेने राष्ट्रपतींची भेट घेत आहोत. फक्त खासदार नाही तर आमदारदेखील या शिष्टमंडळात असतील. सर्वसमावेशक शिष्टमंडळ आज भेट घेईल. मराठा आंदोलनाची व्याप्ती राज्यात वाढत चालली आहे. त्याला विरोध म्हणून इतर आंदोलने उभी राहत आहेत. संसदेचं विशेष अधिवेशन राष्ट्रपती यांनी बोलावून आरक्षणाचा 50 टक्क्याचा कोटा वाढवावा. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा, ही आमची मागणी आहे, असं संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

ठाकरे गटाचे शिष्टमंडळ आज राष्ट्रपतींना भेटणार आहे. मराठा आणि धनगर आरक्षणासाठी विशेष अधिवेशन घेण्याची मागणी या भेटीत केली जाणार असल्याची माहिती आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रपतींना ठाकरे गटाच्या खासदारांनी पत्र लिहून वेळ मागितली होती. त्यानंतर आज राष्ट्रपतींना भेटण्याची वेळ ठाकरे गटाला मिळाली आहे. त्यानुसार खासदार संजय राऊत, विनायक राऊत, अरविंद सावंत, प्रियंका चतुर्वेदी यांच्यासह ठाकरे गटाचे खासदार आणि आमदार आज राष्ट्रपतींची भेट घेणार आहे.

फडणवीसांवर साधला निशाणा

राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्यात थांबायला वेळ आहे का? ते इतर राज्यातील प्रचारात असतील तर राज्यातील प्रश्नांचं काय? त्याकडे कोण लक्ष देणार? , असं म्हणत राऊतांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

- Advertisement -

छगन भुजबळ यांनी ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यांनी थेट सरकारच्या विरोधात भूमिका घेतली आहे. यावर बोलताना, हा विषय गंभीर आहे. राज्यात मंत्रिमंडळात गँगवॉर आहे. हे म्हणाल्यावर माझ्यावर टीका केली. पण ते खरं आहे हे दिसत आहे. आम्ही या गंभीर प्रश्नी आज राष्ट्रपतींची भेट घेत आहोत, असं राऊत म्हणाले.

(हेही वाचा: Maharashtra Politics : ओबीसी मेळाव्याला जाण्यास पक्षाने परवानगी नाकारली; पंकजा मुंडेंचे मोठं विधान )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -