Sunday, April 11, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी महाविकास आघाडीकडून विरोधकांनी जरूर काहीतरी शिकावं, संजय राऊतांचा विरोधकांना टोला

महाविकास आघाडीकडून विरोधकांनी जरूर काहीतरी शिकावं, संजय राऊतांचा विरोधकांना टोला

देशातील सर्व २७ विरोधी पक्षांच्या प्रमुखांना ममता बॅनर्जींचे पत्र

Related Story

- Advertisement -

देशातील सर्व विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांना पश्चिम बंगालमधील टीएमसीच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी पत्र पाठविले आहे. ममता बॅनर्जी यांनी या पत्रात देशातल्या लोकशाहीसंदर्भात काही टिप्पणं दिले आहेत. देशात नक्की काय होत आहे आणि एक आवाहन केले आहे की, सर्वांनी भाजपविरोधात एकत्र यायला पाहिजे असे पत्र २७ पक्ष प्रमुखांना पाठविले आहे. या पत्रावर सर्व विरोधी पक्ष प्रमुखांनी विचार करुन एकत्र यायला हवे आणि एकत्र येऊन पुढील दिशा ठरवल्याशिवाय ममता बॅनर्जी यांनी सांगितलेले संकट दूर होणार नाही असे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे. १९७५ च्या आणीबाणीनंतर सर्व विरोधी पक्ष एकत्र आले होते. तेव्हा त्यांना एकत्र आणण्याचे काम जयप्रकाश नारायण केले होते. आज कोणी जयप्रकाश नारायण नाही हे दुर्दैव असल्याचे राऊतांनी म्हटले आहे.

देशाच्या राजकारणाला महाराष्ट्र दिशा देत असतो महाराष्ट्र महाविकास आघाडी हा एक असा प्रयोग देशाच्या राजकारणात झालेला आहे. संपूर्ण देशातल्या भाजप विरोधी पक्षानी यातून काहीतरी शिकाव काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना असे भिन्न पक्ष महाराष्ट्रात सरकार चालवत आहे. आणि एक आदर्श सरकार आहे असे मी मानतो तर अशा प्रकारची आघाडी युपीएच्या माध्यमातून निर्माण करावी ममता बॅनर्जी यांनी त्याच प्रकारच्या सूचना केल्या आहेत. महाराष्ट्राने नवीन दिशा दाखवली आहे. महाराष्ट्राने जे करुन दाखवले आहे. ते राष्ट्रीय स्तरावर होण्याची गरज असल्याचे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

लॉकडाऊन संदर्भातील घोषणेविषयी सांगू शकत नाही कारण ती सरकारी घोषणा असेल, कारण सरकारच्या संदर्भातले निर्णय सरकार घेईल. लसीकरणासंदर्भात केंद्राने महाराष्ट्राकडे काळजीपूर्वक पाहणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती वाढत आहे. निवडणूकांवर लक्ष देण्यासोबतच इतर राज्यांकडे केंद्राने लक्ष देणे आवश्यक आहे. चार राज्यात होणाऱ्या निवडणूकांवर केंद्र सरकारचे अधिक लक्ष आहे. महाराष्ट्र मोठे राज्य आहे. मुंबईसारख्या शहरात मोठ्या प्रमाणात लोकसंख्या आहे. त्यामुळे केंद्र सरकारने राज्याकडे लक्ष देणे आवश्यक असल्याचे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे.

- Advertisement -