घरमहाराष्ट्रबदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे माझ्यावर कारवाई, संजय राऊतांचे न्यायालयात शपथपत्र

बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे माझ्यावर कारवाई, संजय राऊतांचे न्यायालयात शपथपत्र

Subscribe

राजकीय सुडबुद्धीने माझ्यावर कारवाई होत असल्याचा दावा केला आहे. तसंच, राज्यातील बदललेल्या राजकीय शत्रुत्त्वामुळे आपल्याला अटक करण्यात आल्याचंही ते म्हणाले.

मुंबई – गोरेगाव पत्राचाळ प्रकरणी (Goregao Patrachawl Case) संजय राऊत (Sanjay Raut) तब्बल १०३ दिवस तुरुंगात होते. त्यांना अखेर जामीन मिळाला असला तरीही ईडीचा त्यांच्या जामीनाला विरोध आहे. त्यामुळे त्यांचा जामीन रद्द करावा अशी मागणी करणारी याचिका ईडीने मुंबई उच्च न्यायालयात केली आहे. याप्रकरणी आता १२ डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे. परंतु, याआधीच संजय राऊत यांनी न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे. यामध्ये त्यांनी राजकीय सुडबुद्धीने माझ्यावर कारवाई होत असल्याचा दावा केला आहे. तसंच, राज्यातील बदललेल्या राजकीय शत्रुत्त्वामुळे आपल्याला अटक करण्यात आल्याचंही ते म्हणाले.

हेही वाचा – संजय राऊतांना पुन्हा होणार अटक? ‘या’ प्रकरणात बेळगाव कोर्टाकडून समन्स जारी

- Advertisement -

संजय राऊतांनी सादर केलेल्या शपथपत्रात शिंदे-फडणवीस सरकारवर अंगुलीनिर्देश केले आहेत. राज्यात राजकीय परिस्थिती बदलल्यानंतर राजकीय शत्रुत्वामुळे आपल्याला अटक करण्यात आली. बदललेली राजकीय परिस्थिती हेच आपल्या अटकेमागचे मुख्य कारण आहे. गोरेगाव पत्राचारळ पुनर्विकास प्रकल्प प्रत्येक राजकीय पक्ष आणि नेत्याला हवा होता. म्हणूनच पत्राचाळ पुनर्विकासाच्या आयोजित बैठकांना मी जात होतो. कोणत्याही प्रकल्पातील चर्चेच्या बैठकीत सहभागी होणं गुन्हा ठरत नाही. या प्रकरणात माझ्यावर दाखल झालेले गुन्हे अद्यापही पुराव्यांअभावी सिद्ध झालेले नाहीत. तरीही मला अटक करण्यात आली होती, असं संजय राऊतांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे.

संजय राऊतांना आणखी एक समन्स

- Advertisement -

प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी संजय राऊत यांना बेळगाव कोर्टाने समन्स बजावला आहे. या समन्सनुसार राऊतांना 1 डिसेंबर रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. संजय राऊत यांनी बेळगावात 30 मार्च 2018 रोजी राऊतांनी प्रक्षोभक भाषण केलं होत, याप्रकरणीच राऊतांना समन्स जारी केला आहे. या समन्सनुसार आता संजय राऊत 1 डिसेंबरला कोर्टात हजेरी लावणार आहेत.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -