घरताज्या घडामोडीPhone tapping : राज्यपाल हे भाजप प्रदेशाध्यक्ष असल्यासारखे वागत आहेत - संजय...

Phone tapping : राज्यपाल हे भाजप प्रदेशाध्यक्ष असल्यासारखे वागत आहेत – संजय राऊत

Subscribe

गोवा विधानसभा निवडणुकीच्या निकालाची तारीख जशी जवळ येत आहे, तसतसेच फोन टॅपिंगचे प्रकार आता गोव्यातही सुरू झाले आहेत. फोन टॅपिंगचा महाराष्ट्र पॅटर्न आता गोव्यातही सुरू झाला आहे. तसेच १० मार्चनंतर केंद्रीय तपास यंत्रणा या सक्रीय होतील, असा इशारा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. माझा फोन केंद्रीय तपास यंत्रणा आताही टॅप करत आहेत. तसेच महाराष्ट्राचे राज्यपाल हे भाजपच्या प्रदेशाध्यक्षा प्रमाणे वागत असल्याची टिकाही त्यांनी यावेळी केली. राज्यपाल बदलावा ही महाराष्ट्राची इच्छा असल्याचेही ते म्हणाले.

महाविकास आघाडी स्थापन होत असताना झालेल्या फोन टॅपिंगच्या प्रकरणात कुलाबा पोलीस स्टेशन, पुणे बंद गार्डनला गुन्हा दाखल झाला. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ज्या हालचाली सुरू झाल्या, त्यामध्ये आमचे फोन टॅप झाले. आम्ही कोणाशी बोलतोय, कुणाला भेटतोय, काय बोलतोय ही सगळी माहिती त्यावेळच्या पोलीस अधिकारी कोणाला देत होत्या हे सगळ्यांना माहितेय. अशा प्रकारचे पॅटर्न आता अशा राज्यातही राबवले जात आहे, ज्या राज्यांमध्ये निवडणुका आहेत. दोन दिवसांपूर्वी मला गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे नेते दिगंबर कामत भेटले. त्यांनी भीती व्यक्त केली की आमचे फोन टॅप होत आहेत. त्यांनी गोव्यात एक पत्रकार परिषद घेतली आणि फोन टॅप होत असल्याची माहिती दिली. त्यांना मी माहिती दिली की सुधीर ढवळीकर, विजय सरदेसाई हे विरोधी पक्षाचे प्रमुख नेते आहेत, त्यांच्याही फोन टॅपिंगचे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे तुम्ही काळजी घ्या असा सल्ला मी त्यांना दिला. गोव्यामध्ये शांतता फोन टॅपिंग सुरू आहे. हा महाराष्ट्र पॅटर्न आहे. महाराष्ट्र पॅटर्नचे जे प्रमुख होते, तेच गोव्याच्या पॅटर्नचेही प्रमुख आहेत. त्यामुळे आम्ही सगळे काळजी घेतोय.

- Advertisement -

दिगंबर कामत यांच्याशी बोललो असून आम्ही तुमच्यासोबत असल्याचे सांगितले. पण अशाच प्रकारे फोन टॅपिंग, राज्यपाल या माध्यमातून तुम्हाला सत्ता आणायची असेल, केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून सत्ता आणायची असेल. महाराष्ट्रात हे सगळ करूनही सत्ता येत नसल्याचे संजय राऊत म्हणाले. केंद्रीय तपास यंत्रणा गोव्यात सुद्धा सक्रीय होईल. त्रिशंकु अवस्था झाल्यास गोव्यातही केंद्रीय यंत्रणा सक्रीय होईल असे ते म्हणाले. भाजपा गोव्यात येणार नाही, हे मी पहिल्या दिवसापासून सांगतोय. केंद्रीय तपास यंत्रणा १० मार्च गोव्यात सक्रीय होतील. गेल्या काही दिवसांपासून म्हणूनच भाजपने तयारी सुरू केली आहे. महाराष्ट्रातही त्यांनी प्रयत्न केला, आता गोव्यातही असाच प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले. माझे फोन तर आताही टॅप करताहेत. केंद्रीय तपास यंत्रणा या माझा फोन आताही टॅप करताहेत पण मी माझा फोन बदललेला नाही. त्यांना जे एकायचे आहे ते एकुद्या.

या देशात लोकशाही धोक्यात आली आहे ती घटनात्मक संस्थांवर बसवलेल्या राजकीय व्यक्तींमुळे. राज्यपाल हटवले पाहिजे हे सरकारचे नव्हे तर संपूर्ण राज्याचे म्हणणे आहे. राज्यपाल हे भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षासारखे काम करत आहेत. हे राज्याला देशाला घटनात्मक पदाला शोभणारे नाही. राज्यपालांना विधीमंडळाचे स्वातंत्र्य आणि महाराष्ट्र सरकारचे महत्व असेल ज्या सरकारचे ते प्रमुख आहेत, तर त्यांनी तारीख द्यायला हवी असेही ते म्हणाले.

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -