घरमहाराष्ट्रनवनीत राणांनी सीबीआयने छापा टाकलेल्या कंपनीकडून दीड कोटींचं कर्ज घेतलं; राऊतांचा गंभीर...

नवनीत राणांनी सीबीआयने छापा टाकलेल्या कंपनीकडून दीड कोटींचं कर्ज घेतलं; राऊतांचा गंभीर आरोप

Subscribe

शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्याबाबत आणखी एक खळबळजनक दावा केला आहे. सीबीआयने ज्या कंपनीवर छापा टाकला होता, त्या कंपनीकडून नवनीत राणा यांनी दीड कोटींचं कर्ज घेतलं असा दावा संजय राऊत यांनी केला. संजय राऊत यांनी ट्विट करत हा दावा केला आहे.

“१८ आणि ११ एप्रिल २०१९ रोजी ट्रान्सकॉन डेव. किर्ती केडिया यांच्या मालकीच्या प्रायव्हेट लिमिटेडवर सीबीआयने छापा टाकला. द ग्रेट नवनीत राणा’च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांनी केडियाच्या मालकीच्या कंपनीकडून १.५० कोटी कर्ज घेतले होते. हे खरे आहे का?,” असा सवाल संजय राऊत यांनी केला.

- Advertisement -

नवनीत राणांनी डी गँगशी संबंधित लकडावालाकडून ८० लाखांचं कर्ज घेतलं

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी डी गँगशी संबंधित युसूफ लकडावालाकडून ८० लाखांचं कर्ज घेतल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांनी यासंदर्भातील कागद ट्विट केले आहेत. या ट्विटमध्ये त्यांनी अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीला देखील प्रश्न केले आहेत.

- Advertisement -

नवनीत राणा यांनी निवडणूक आयोगाला जी माहिती दिली होती, तो कागद संजय राऊत यांनी समोर आणला आहे. राऊत यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, नवनीत राणा यांनी युसूफ लकडावालाकडून ८० लाखांचं कर्ज घेतलं आहे. ज्याचा तुरुंगात मृत्यू झाला होता. लकडावालाला ईडी मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली होती. त्याचे डी गँगशी संबंध होते. त्यामुळे ईडीने या प्रकरणाचा तपास केला का? राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न, असं राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -