Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र डॉक्टरेट एकनाथ शिंदेंना संजय राऊतांचे दोन सवाल, सावरकरांबद्दल सांगावी 'ही' माहिती

डॉक्टरेट एकनाथ शिंदेंना संजय राऊतांचे दोन सवाल, सावरकरांबद्दल सांगावी ‘ही’ माहिती

Subscribe

नवी दिल्लीः डॉ. एकनाथ शिंदे यांना फोन करुन विचारा की सावरकरांनी कोणत्या समुद्रात उडी घेतली होती आणि कोणत्या बंदरापर्यंत गेले होते, असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डी. वाय. पाटील विद्यापीठाकडून डी लिट देण्यात आली आहे. त्यावर मी डॉक्टरच आहे. छोटी मोठी ऑपरेशन करतच असतो, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली आहे. याबाबत विचारलेल्या प्रश्नावर खासदार राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टीका केली. ते डॉक्टर झाले असले तरी आम्ही मुकामार देतो. आणि आम्ही मुकामार देतच राहणार आहोत. आता प्रत्येक भ्रष्टाचाराला डॉक्टरेट मिळेत. भ्रष्टाचाऱ्यांना डी लिट देणाऱ्या विद्यापीठांची चौकशी करायला हवी. त्यांच्या अशा कोणत्या फाईली अडकून पडल्या आहेत. ज्यामुळे डी. वाय. पाटील विद्यापीठाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डी लिट दिली. अशा डॉक्टरेट पायलीला पन्नास मिळतात. शिंदेंनी स्वतःवरच एक शस्त्रक्रिया केली होती, असा निशाणाही राऊत यांनी साधला.

- Advertisement -

तानाजी सावंत यांनी बाळासाहेब ठाकरे व अटलबिहारी वाजपेय यांच्या सभेला होणाऱ्या गर्दीची तुलना केली. त्यावर सजंय राऊत यांनी निशाणा साधला. तानाजी सावंत यांनाही डॉक्टरेट द्यायला हवी, असा टोला राऊत यांनी लगावला.

शिंदे-फडणवीस सरकार कोसळेल आणि महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होईल हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलेले विधान खरे आहे. हे सरकार कोसळणारच आहे, असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला. पण जर कायद्याने सर्व गोष्टी होणार असतील तरच हे शक्य आहे, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

सावरकर गौरव यात्रा नसून अदानी बचाव यात्रा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गौतम अदानीला वाचवत आहेत. देशात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार सुरु आहे. जनतेमध्ये मोदी सरकारविरोधात प्रचंड रोष आहे. हा रोष कधी रस्त्यावर येईल हे कळणारही नाही, असा दावा संजय राऊत यांनी केला.

- Advertisment -