घरमहाराष्ट्रमुख्यमंत्र्यांच्या तोंडाला बूच बसलयं; राऊतांची जीभ पुन्हा घसरली

मुख्यमंत्र्यांच्या तोंडाला बूच बसलयं; राऊतांची जीभ पुन्हा घसरली

Subscribe

मुंबईः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तोंडाला बूच बसलं आहे. ते श्रीसदस्यांच्या निधनावर काहीच बोलत नाही, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी केली. महाराष्टात औरंगजेबाचं सरकार आहे. मोघलाई सुरु आहे, असा निशाणाही खासदार राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर साधला.

खासदार राऊत म्हणाले, मी मुख्मत्र्यांशी बोलत नाहीत. ते निघृणच आहेत. मात्र पालघर येथील साधूंची हत्या झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि भाजपने आंदोलन केले होते. खारघर येथे ५० हून अधिक श्रीसदस्यांचे निधन झाले आहे. त्यावर आता भाजप आणि फडणवीस आंदोलन का करत नाहीत. ते का गप्प आहेत. फडणवीस यांच्या चेहऱ्यावर साधा दुःखाचा भाव दिसत नाही.

- Advertisement -

महाराष्ट्रात सध्या मोघलाई सुरु आहे. पाण्यासाठी आंदोलन करणाऱ्यांना ताब्यात घेतलं जातंय. त्यांच्यावर गुन्हे नोंदवले जात आहेत. आमचे आमदार नितीन देशमुखे हे पाण्यासाठी आंदोलन करत होते. तेथे खारं पाणी येत. नवजात बालक ते पाणी पितात. त्यांना याचा नाहक त्रास होतो. या पाण्यामुळे कर्करोगासारखे गंभीर आजार होत आहेत. नागरिकांना शुद्ध पाणी मिळावं म्हणून नितीन देशमुख हे आंदोलन करत होते. त्यांना फडणवीसांच्या पोलिसांनी ताब्यात घेतलं. विरोधी पक्षनेते असताना फडणवीस यांनी आंदोलन केले होते. आता ते दुसऱ्यांना आंदोलन करु देत नाहीत. तसेच विविध मुद्द्यांवर लोकांना आंदोलन करु दिली जात नाहीत. शेतकरी आत्महत्या करत आहेत. तरीही सरकार गप्प आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला.

पुढे खासदार राऊत म्हणाले, राष्ट्रवादीत जे काही सुरु आहे त्यावर मी बोलू इच्छित नाही. त्यांचा तो अंतर्गत प्रश्न आहे. पण महाविकास आघाडीवर मी बोलतच राहणार आहे. राष्ट्रवादीत फूट पाडण्याचा प्रयत्न भाजप करत आहे हे सत्य आहे. सत्य मी बोलणारच आहे.

- Advertisement -

शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादीत फूट पाडण्यास संजय राऊतच जबाबदार आहेत या दाव्याचेही खासदार राऊत यांनी खंडन केलं. मी कशासाठीही जबाबदार नाही. ही सर्व भाजपची खेळी आहे. भाजप दबावतंत्र वापरून फोडाफोडीचं राजकरण करत आहे. माझ्यावर आरोप करणाऱ्यांकडे मी लक्ष देत नाही, असेही राऊत यांनी स्पष्ट केलं.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -