घरमहाराष्ट्रसावरकरवादी शिंदे दाढी कापणार का? गोमांस खाणे भाजप मान्य करेल का?- संजय राऊत

सावरकरवादी शिंदे दाढी कापणार का? गोमांस खाणे भाजप मान्य करेल का?- संजय राऊत

Subscribe

 

मुंबईः सावरकरांना दाढी वाढवणे कधीच मान्य नव्हते. दाढी फक्त शिवाजी महाराजांना चांगली दिसते. त्यामुळे इतर कोणी दाढी वाढवू नये. माणसाने कसं चकचकीत राहायला पाहीजे, असे सावरकरांचे मत होते. मग सावरकरांना मानणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाढी कापतील का?, असा निशाणा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी साधला.

- Advertisement -

संजय राऊत म्हणाले, भाजप म्हणते गाय गोमाता आहे. सावरकरांना हे मान्य नव्हते. सावरकर गायीला उपयुक्त पशू मानायचे. गाईने दुध देणे बंद केले तर गोमांस खाण्यास काहीच हरकत नाही, असे सावरकरांचे विचार होते. हे विचार भाजपला मान्य होतील का?. आधी सावरकर वाचा आणि मग त्यांच्या नावाने यात्रा काढा.

दाढी वाढवण्यावर सावरकरांचे जे विचार होते ते मुख्यमंत्री डॉ. मिंधे आणि त्यांचे ४० आमदार मान्य करणार का?, असा सवाल करत खासदार संजय राऊत म्हणाले, दाढी वाढवणे आपल्या धर्मात बसत नाही. त्यामुळे दाढी वाढवू नका. दाढी फक्त शिवाजी महाराजांनाच चांगली दिसते, असे सावरकरांचे विचार होते. सावरकरांचा कोणताही फोटो बघा ते कसे दिसतात. त्यामुळे सावरकरांचे विचार मुख्यमंत्री शिंदे यांना मान्य आहेत का?. या विचारांना अनुसरुन मिंधे आणि त्यांचे ४० आमदार दाढी कापणार का?, असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला.

- Advertisement -

पुढे संजय राऊत म्हणाले, तुम्ही सावरकारांना नीट वाचले आहे का?. मुख्यमंत्री शिंदे, त्यांचे ४० आमदार आणि भाजप यांनी बसून आधी सावरकरांना नीट वाचले पाहिजे. त्यांच्या विचारांचे पारायण केले पाहिजे. मग त्यांनी यात्रा काढायला हवी. सावरकर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये मतभेद होते. सावरकरांना शेंडी, जानव्ह्याचे हिंदुत्त्व कधीच मान्य नव्हते. बाळासाहेबांनाही असे हिंदुत्त्व कधीच मान्य नव्हते.

 

संभाजीनगर दंगल राजकीय अजेंडा- संजय राऊत

आपल्या देशात जे काही सुरु आहे ते सर्व राजकीय अजेंड्यासाठीच सुरु आहे. संभाजीनगरमध्ये जी दंगल झाली तोही राजकीय अजेंडाच होता. गौरव यात्रा निघत आहे तोही राजकीय अजेंडाच आहे, असेही संजय राऊत यांनी सांगितले.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -