Thursday, June 1, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र गद्दारांना चिरडायचे आहे; संजय राऊतांचे मालेगावच्या सभेत आवाहन

गद्दारांना चिरडायचे आहे; संजय राऊतांचे मालेगावच्या सभेत आवाहन

Subscribe

मालेगावः ज्यांनी ज्यांनी गद्दारी केली. त्यांना त्यांना चिरडायचं आहे, असा घाणाघात खासदार संजय राऊत यांनी मालेगावच्या सभेत केला.

मालेगाव येथे उद्धव ठाकरे यांच्या जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत खासदार राऊत यांनी निवडणूक आयोगावर टीका केली. ते म्हणाले, ही गर्दी म्हणजे मालेगावचे शोले भडकले आहेत. ही गर्दी निवडणूक आयोगाला दाखवा. शिवसेना निवडणूक आयोगाला विचारून स्थापन केलेली नाही. बाळासाहेबांच्या विचारांनी शिवसेना स्थापन झालेली आहे. सकाळपासून एकच चर्चा सुरु होती की तोफ कोणावर धडाडणार आहे. पण ढेकणांना चिरडायला तोफेची गरज लागत नाही. ही जनताच त्यांना चिरडून टाकणार आहेत. ज्यांनी ज्यांनी गद्दार केली त्यांना चिरडायचं आहे.

- Advertisement -

या सभेसाठी सर्व जाती धर्माच्या लोकांना निमंत्रण होते. ही गर्दी म्हणजे सर्व जाती धर्माच्या लोकांचा उद्धव ठाकरे यांना पाठिंबा आहे हेच या गर्दीतून स्पष्ट होते. तुम्ही शिवसेना नाव चोरले. चिन्ह चोरले. पण ही गर्दी तुम्ही चोरु शकत नाही, असे आवाहन खासदार संजय राऊत यांनी केले.

या सभेत उद्धव ठाकरे यांनी भाजपवरही निशाणा साधला. उद्धव ठाकरे म्हणाले, मोदींबाबत काही बोललं की लगेच देशाचा अपमान होतो. मोदी म्हणजे देश नाहीत. तुमच्या विरोधात कोणी बोलायचे नाही. लगेच तुम्ही कारवाई करता. एखाद्याच्या कुटुंबाला त्रास देणं. त्याची विनाकारण चौकशी करणं हे तुमचं हिंदुत्त्व आहे. अनिल देशमुखांच्या सहा वर्षांच्या नातीची तुम्ही चौकशी केलीत. काय दोष होता तिचा. लालू प्रसाद यादव यांच्या गरोदर सुनेची तुम्ही चौकशी केलीत. ती बेशुद्ध पडेपर्यंत तुम्ही तिची चौकशी केलीत. ही कोणती पद्धत आहे. आमचे हिंदुत्त्व तुमच्यासारखे नाही. शेंडी, जानव्याचे आमचे हिंदुत्त्व नाही. हेच माझ्या आजोबांनी सांगितलं. माझ्या वडिलांनी सांगितलं. आता मीही तेच सांगतो आहे.

- Advertisement -

लोकांचा छळ करणं हे आमचं हिंदुत्त्व नाही. तुम्ही अनिल देशमुखांच्या सहा वर्षांच्या नातीची चौकशी केलीत. लालू प्रसाद यादव यांच्या गरोदर सुनेची ती बेशुद्ध पडेपर्यंत चौकशी केलीत, हे तुमचे हिंदुत्त्व आहे का?, असा निशाणा उद्धव ठाकरे यांनी भाजपवर साधला.

 

- Advertisment -