Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी उत्तर प्रदेश निवडणुकीत ४०३ नव्हे तर १०० जागा लढवणार, संजय राऊतांची घोषणा

उत्तर प्रदेश निवडणुकीत ४०३ नव्हे तर १०० जागा लढवणार, संजय राऊतांची घोषणा

२०१७ मध्ये शिवसेनेची कामगिरी निराशाजनक

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्रात महाविकास आघाडी स्थापन करुन शिवसेना सत्तेत आली आहे. तर पुढच्या वर्षी उत्तर प्रदेशमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकाही शिवसेना लढवणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. मात्र शिवसेना उत्तरप्रदेशमध्ये ४०३ जागा लढवणार असल्याचे युपीतील शिवसेना कार्यकारणीच्या बैठकीत ठरलं होते. तसं त्यांनी जाहीरही केलं आहे. परंतु अवघ्या २४ तासांत शिवसेनेने युटर्न घेतला आहे. शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी युपीमध्ये १०० जागांवरच लढणार असल्याचे स्पष्ट केलं आहे. उत्तर प्रदेशमधील निवडणूक शिवसेना स्वबळावर लढणार असल्याचे म्हटलं आहे. तसेच गोव्यातील निवडणुकीत २० जागांवर लढणार असल्याचेही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलं आहे की, आम्ही उत्तर प्रदेशमध्ये एकूण १०० जागांवर निवडणूक लढणार आहोत. तर गोव्यात २० जागांवर निवडणूक लढवणार असून युती करु शकतो. अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे. गुजरातच्या मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याबाबत राऊतांना प्रश्न करण्यात आला यावर हा भाजपचा अंतर्गत मुद्दा असल्याचे राऊतांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

आधी ४०३ मग २४ तासात युटर्न

शिवसेना उत्तर प्रदेश कार्यकारणीच्या बैठकीत विधानसभा निवडणुकीत ४०३ जागांवर लढणार असल्याचे ठरले होते. तसे त्यांच्याकडून पत्रकही जारी करण्यात आले होते. मात्र अवघ्या २४ तासात महाराष्ट्र शिवसेनेन युटर्न घेत १०० जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केलं आहे. शिवसेनेच्या भूमिकेमुळे संभ्रमाचे वातावरण तयार झालं आहे. युपी शिवसेना कार्यालयाने पत्रक प्रसिद्ध करत म्हटलं आहे की, शिवसेना पक्ष एकूण ४०३ जागांवर आपला उमेदवार देणार आहे. मात्र राऊतांच्या वक्तव्यामुळे गोंधळ निर्माण झाला असून नक्की किती जागा शिवसेना लढवणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

- Advertisement -

२०१७ मध्ये शिवसेनेची कामगिरी निराशाजनक

उत्तर प्रदेशमधील २०१७ च्या निवडणुकीत शिवसेनेकडून ५७ जागांवर उमेदवार देण्यात आला होता. यावेळी शिवसेनेच्या सर्वच ५७ उमेदवारांचा दारुन पराभव झाला आहे. सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त करण्यात आले होते मात्र एकाचे डिपॉझिट वाचवण्यात शिवसेना यशस्वी झाली होती. भाजपविरोधात शिवसेना टीक धरु शकली नाही. अनेक जागी शिवसेनेच्या उमेदवाराला १०० पेक्षा कमी तर काही ठिकाणी २०० मतंही मिळाली नाहीत. उत्तर प्रदेशमध्ये २०१७ च्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला नोटापेक्षाही कमी मत मिळाली होती.


हेही वाचा : अमित शहा यांनी एका रात्रीत बदललं गुजरातच राजकारण!


 

- Advertisement -