Goa Assembly Election 2022 : गोव्यातून शिवसेना दहा ते बारा जागा लढणार, संजय राऊतांची घोषणा

Goa Assembly Election 2022 sanjay raut says goa elections steering of maha aaghadi govt hand of uddhav thackeray

गोवा विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोर धरलेला आहे. गोव्यातून विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी शिवसेना दहा ते बारा जागांवर लढणार असल्याची घोषणा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. गोव्याच्या राजकारणात शिवसेना नवीन पक्ष नाहीये. जरी निवडणुकीमध्ये शिवसेनेला अपयश मिळत असलं तरी शिवसेना दमदारपणे काम करत आहे. गोव्यातील निवडणूका २०१७ साली लढवल्या होत्या. परंतु यावेळी गोव्यातील राजकीय वातावरण गोव्यातील जनतेसाठी काही आशादायी दिसत नाहीये. वातावरण पूर्ण गढूळ झालंय.
अनेक राजकीय पक्ष नव्याने उतरले आहेत. उमेदवारांच्या याद्या जाहीर होत आहेत. नक्की कोण कोणत्या पक्षातून निवडणुका लढतयं. हे सुद्धा स्पष्ट होत नाही. हिंदी भाषेमध्ये आयराम-गयाराम हा शब्द प्रचलित आहे. त्याप्रमाणे गोव्यामध्ये आले माऊ- गेले माऊ हा शब्द राजकीय प्रचारात प्रचलित आहे. कारण कधी कोण गेले आणि कधी कोण जाईल याचा काहीही भरोसा नाहीये. त्याही परिस्थितीत शिवसेना ही निवडणूक लढत आहे, असं खासदार संजय राऊत म्हणाले.

शिवसेनेची पहिली यादी जाहीर

संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते म्हणाले की, गोव्यातून शिवसेना दहा ते बारा जागा लढणार आहे. आज नऊ उमेदवारांची घोषणा आम्ही करत आहोत. पेडणे, माफसा, शिवली, हळदोणे, पणजी, परये, वाळपयी, वास्को आणि केपे अशा नऊ जागांवर शिवसेना निवडणुक लढणार आहे. ही पहिली यादी असून उद्यापर्यंत आम्ही उरलेल्या तीन मतदार संघाची घोषणा करणार आहोत. यावेळेस शिवसेना या निवडणुकीमध्ये गांभीर्याने आणि ताकदीने लढणार आहे, असं संजय राऊत म्हणाले.

शिवसेनेतून कोणत्या उमेदवारांना संधी ?

पेडणे- सुभाष केरकर
माफसा- जितेश कामत
शिवली- भीमसेन परेरा
हळदोणे- गोविंद गोवेकर
पणजी – शैलेंद्र वेलिंगकर
परये- गुरुदास गावकर
वास्को- मारुती शिरगावकर
केपे- अॅलेक्सी फर्नांडिस

शिवसेनेचे वाघ गोव्याच्या विधानसभेत असणं गरजेचं

गोव्याच्या राजकारणातील जळमटं दूर करायची असतील आणि आले माऊ-गेले माऊ संस्कृती जर गोव्यातून संपवायची असेल तर शिवसेनेचे आमदार गोव्याच्या विधानसभेत असणं गरजेचं आहे. गोव्याच्या जनतेचा आवाज आणि स्थानिकांचे प्रश्न, पर्यावरणाचे प्रश्न हे जर थोपवायचं असेल तर शिवसेनेचे वाघ गोव्याच्या विधानसभेत असणं गरजेचं आहे. गोव्याची जनता यावेळी शिवसेनेला संधी देईल, अशी मला खात्री आहे, असं राऊत म्हणाले.

गोव्यातील राजकारण ५ ते १० लोकांच्या मुठीत

गोव्यातील राजकारण हे गेल्या काही वर्षांपासून ५ ते १० लोकांच्या मुठीत आहे. ही लोकं भुमाफिया, राजकीय घराण्यातले असून सामान्य राजकीय कार्यकर्त्याला कोणतेही स्थान मिळालेले नाहीये. इतक्या भ्रष्ट पद्धतीने गोव्याच्या निवडणूका लढवल्या जातात आणि राज्य चालवलं जातं. त्यामुळे या प्रस्थापितांना घरी बसवायचं असेल तर जनतेतल्या सामान्य नागरिकांनी उमदेवारी द्यायला हवी. जे आम्ही महाराष्ट्रात करतो. बाळासाहेब ठाकरेंनी सामान्य माणसाला राजकारणामध्ये आणून ताकद दिली आहे. अशा पद्धतीचा एक प्रवाह सुरू करावा. त्यामुळे त्या निवडणुकीच्या मतदार संघातले सामान्य चेहरे आम्ही निवडणुकांमध्ये उतरवण्याचं ठरवलेलं आहे.


हेही वाचा : Road Safety World Series: रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमधून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची माघार, जाणून घ्या कारण