संजय राऊतांनी पत्रकारांच्या ‘त्या’ प्रश्नाला उत्तर देणं टाळलं, कारण काय?

गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गट आणि त्यांच्या नेत्यांवरील अडचणी वाढत असतानाच संजय राऊतांवर आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत आज त्यांना पत्रकारांनी विचारले असता त्यांनी उत्तर देणं टाळलं.

the police act as political agents and distribute money; Sanjay Raut's allegation
संग्रहित छायाचित्र

मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात मध्यरात्री त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गट आणि त्यांच्या नेत्यांवरील अडचणी वाढत असतानाच संजय राऊतांवर आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत आज त्यांना पत्रकारांनी विचारले असता त्यांनी उत्तर देणं टाळलं.

हेही वाचा – आम्ही वैचारिक विरोधक मानतो; उद्धव ठाकरे यांच्या टीकेला फडणवीसांचे उत्तर

शिवसेना खासदार संजय राऊत रोज सकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधतात. आदल्या दिवशी घडलेल्या घडामोडींवर भाष्य करत दिवसभरातील कामकाजाविषयी ते माहिती देत असतात. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवरही ते सडेतोड उत्तरे देत असतात. काल मध्यरात्री त्यांच्याविरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल झाला. संजय राऊत नुकतेच १०० दिवस तुरुंगात राहून बाहेर आले आहेत. त्यातच त्यांच्याविरोधात पुन्हा गुन्हा दाखल झाल्याने आता पुढची पायरी काय याबाबत पत्रकारांनी त्यांना विचारले असता त्यांनी प्रश्नाकडे कानाडोळा करत दुसऱ्या पत्रकाराच्या प्रश्नाकडे आपले लक्ष वेधले. त्यामुळे गुन्ह्यासंबंधीच्या प्रश्नाला त्यांनी बगल दिली. त्यांनी हा प्रश्न का अनुत्तरीत ठेवला यामागचे कारण अद्यापही समजू शकलेले नाही. त्यामुळे त्यांच्याविरोधातील गुन्ह्याबाबत ते आता काय पाऊल उचलतात हे पाहावं लागणार आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कालच्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. त्यावरून, शिंदे गटाचे नेते योगेश बेलदार यांनी नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात संजय राऊतांविरोधात तक्रार केली होती. त्यांच्या तक्रारीनुसार भादंवी कलम ५०० प्रमाणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

हेही वाचा – मिंधे, बाजारबुणगे, भंपक, धोकेबाज, ढोंगीबाज; ठाकरे गटाकडून महायुतीवर वाग्-बाण

दरम्यान, आजही राऊतांनी शिंदे गट आणि भाजपावर तोफ डागली आहे. न्याय आणि निर्णय यात फरक आहे. प्रचंड पैशांचा वापर करून निर्णय विकत घेतला. यंत्रणा पायाखाली ठेवणाऱ्या भाजपाविरोधात आमचा लढा आहे. मिंधे गट त्यांचा गुलाम आहे, असं संजय राऊत म्हणाले. निवडणूक आयोगात निकाल लागण्याची प्रक्रिया सुरू होती, तेव्हाच मला दोन हजार कोटींच्या सौद्याची माहिती मिळाली होती. देवेंद्र फडणवीस आणि शिंदे गटातील आमदार जेव्हा निकाल त्यांच्याच बाजूने लागणार असं ठामपणे सांगत होते तेव्हाच मला या सौद्याविषयी कळलेलं. त्यामुळे लवकरच याविषयी सविस्तर माहिती मी देईन, असं संजय राऊत आज म्हणाले.

हेही वाचा – लाल किल्ल्यावर दरवर्षी घुमणार शिवजयंतीचा गजर; मुख्यमंत्र्यांची ग्वाही