मुंबई: पक्ष फोडतात, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हो दोन्ही पक्ष फोडतात. ज्या अजित पवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा वारस म्हणतात, हीच भाजपाची अक्कल आहे, असं म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीकास्त्र डागलं आहे. (Sanjay Raut Balasaheb Thackeray s heir Raj Thackeray Sharad Pawar s Ajit Pawar This is BJP s common sense Sanjay Raut s attack)
शिवसेनेचे खरे वारसदार राज ठाकरे असल्याचं भाजपाने म्हटलं होतं, यावर उत्तर देताना संजय राऊत यांनी भाजपाची थेट अक्कलच काढली आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
उद्या भाजपा राज ठाकरेंना छत्रपती शिवाजी महाराजांचेही वारसदार ठरवतील. बाळासाहेब ठाकरेंचा वारसा काय आहे, हे भाजपाला सांगण्याइतके आम्ही अजून खाली घसरलेलो नाही. जे आपल्या स्वार्थासाठी, राजकीय फायद्यासाठी बाळासाहेबांचा पक्ष फोडतात, महाराष्ट्र तोडण्याची स्वप्न पाहतात, त्यांच्याकडून वारसा कोणाचा हे आम्ही का शिकायचं? शरद पवार हयात असताना त्यांच्या वारस सुप्रिया सुळे नसून मोदींनी भ्रष्टाचारचे प्रचंड आरोप केलेले अजित पवार आहेत, असं म्हणतात. ही भाजपाची अक्कल आहे. त्यामुळे ते अशी विधानं करत आहेत, असं संजय राऊत म्हणाले.
भाजपा कोणालाही अटक करू शकते. मोदी-अमित शहांना ज्यांच्यापासून हरण्याची भीती वाटते, त्या सगळ्यांना हे अटक करू शकतात. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांना लोकमान्य टिळक, भगतसिंगं, राजगुरू, लाल-बाल-पाल, वीर सावरकर या सगळ्यांची भीती वाटत होती. त्यामुळे ब्रिटिशांनी त्यांना तुरुंगात टाकलं किंवा फासावर लटकवलं. मोदींचं सरकार त्याच पद्धतीने काम करत आहे, असा आरोपही राऊतांनी यावेळी केला.
देशातलं सगळ्यात भ्रष्ट सरकार म्हणजे भाजपा
राऊत म्हणाले की, तुम्ही लोकांनी निवडून दिलेल्या विद्यमान मुख्यमंत्र्यांना अटक करत आहात. विद्यमान मंत्र्यांना अटक करताय. देशातलं सगळ्यात भ्रष्ट सरकार तुमचं आहे. ज्यांना अटक करायल हवी, त्यांना तुम्ही मंत्री करता, उपमुख्यमंत्री करता आणि विरोधी पक्षाच्या लोकांना अटक करता, याला हुकूमशाही म्हणतात. त्याच हुकूमशाही विरोधात आम्ही लढत आहोत.
(हेही वाचा: Chitra Wagh : विरोधातला नवा आवाज सुप्रिया सुळेंना सहन होईना, चित्रा वाघ यांची टीका )