Homeताज्या घडामोडीSanjay Raut : भाजप-ठाकरे गटाची जवळीक वाढली; राऊतांकडून फडणवीसांचे सातत्याने कौतुक

Sanjay Raut : भाजप-ठाकरे गटाची जवळीक वाढली; राऊतांकडून फडणवीसांचे सातत्याने कौतुक

Subscribe

गेल्या काही दिवसांपासून सातत्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि भाजप यांच्यातील जवळीक वाढत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोतील नक्षलग्रस्त भागांत जाऊन केलेल्या कार्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी त्यांचे कौतुक केले. त्यानंतर मुख्यमंत्री म्हणून फडणवीस करत असलेल्या कामाचेही त्यांनी कौतुक केले.

नागपूर : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि भाजप यांच्यातील जवळीक वाढत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोतील नक्षलग्रस्त भागांत जाऊन केलेल्या कार्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी त्यांचे कौतुक केले. त्यानंतर मुख्यमंत्री म्हणून फडणवीस करत असलेल्या कामाचेही त्यांनी कौतुक केले. त्यानंतर आता पुन्हा एकदा संजय राऊतांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गुणगान गायले आहेत. त्यामुळे भविष्यात शिवसेना ठाकरे गट आणि भाजप एकत्र येणार का, अशा चर्चांना उधाण आले आहे. (Sanjay Raut BJP Shiv Sena Thackeray group to closer Raut consistently praises Cm Devendra Fadnavis)

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत हे आज नागपुरात आहेत. नागपुरातून त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले. त्यानुसार, “महाराष्ट्राच्या राजकारणात आम्ही नेहमीच संस्कृती जपली. आम्ही निवडणूक वेगवेगळे लढलो. एकमेकांचा पराभव करण्याचा प्रयत्न केला. लोकशाहीत राज्याचा विकास, जनतेचा विकास होणं गरजेचे असते आणि हे जर कोणतं सरकार करत असेल तर, त्या सरकारचे विरोधकांनी स्वागत केले पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीत काही चांगली कामं करण्याचा प्रयत्न केला. त्यांचा कामाला आम्ही पाठिंबा दिला”, असे संजय राऊत म्हणाले.

“यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब ठाकरे आणि वसंतराव नाईक असतील. फार मोठी परंपरा या राज्याला लाभली आहे. व्यक्तीगत शत्रूत्व न ठेवता राजकारण केलं पाहिजे. पण व्यक्तीगत शत्रूत्व ठेऊन राजकारण करण्याची परंपरा दुर्देवाने भाजपनं राज्यात सुरू केली. हे मान्य केलं पाहिजे. ईडी, सीबीआय आणि पोलिसांचा वापर करून आपल्या राजकीय शत्रूंना, राजकीय विरोधकांना खोटे गुन्हे, खोटे खटले दाखल करून त्यांना तरुंगात टाकायचं. ही परंपरा या महाराष्ट्रात कधीच नव्हती. पण हीच परंपरा जर राज्याचे मुख्यमंत्री (फडणवीस) संपवत असतील तर, निश्चितच राज्याचा फायदाच होणार आहे”, असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.

‘भाजपचं राजकारण हे व्यक्तीगत सुडाचं आणि व्यक्तीगत शत्रूत्वाचं’

“देवेंद्र फडणवीस आमचे शत्रू नाहीत. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणात नव्हते, तेव्हापासून आमची आणि भाजपची युती आहे. 25 वर्ष आम्ही एकत्र होतो. अटल बिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन, अडवाणी या भाजपच्या जुन्या नेत्यांसोबत आमची मैत्रीच होती. पण आज आम्ही मित्र राहिलो नाही. मित्राला लात घातली आणि स्वाभिमानी पक्ष असल्याने आम्ही आमचं राजकारण सुरू केलं. राजकारणात काहीच असंबव नसतं. भाजपचं राजकारण हे व्यक्तीगत सुडाचं आणि व्यक्तीगत शत्रूत्वाचं आहे”, असा शब्दांत संजय राऊतांनी भाजपवर टीकास्त्र सोडले.

“कोण कुठे जाणार हे आमचे मित्र देवेंद्र फडणवीस नाही ठरवू शकत, प्रत्येकाचा एक पक्ष असतो. त्या पक्षाचा एक आदर्श असतो. तुम्ही ज्या पद्धतीने आमच्या पक्षाला तोडले आहे. हे कोणत्या आदर्शाचे उदाहरण आहे. आम्ही महाराष्ट्रात कोणत्याही राजकारण्यासोबत यंत्रणांचा गैरवापर करून त्याला तुरुंगात टाकत नाही, ही महाराष्ट्राची परंपरा आहे. पण ही परंपरा तोडत असतील तर, तुमचे स्वागत आहे. पण ज्या भ्रष्टाचाऱ्यांनासोबत तुम्ही घेऊन जात आहेत, त्यांच्याविरोधात आमचा लढा सुरू राहिल”, असेही राऊत यावेळी म्हणाले.


हेही वाचा – Polling in Parli : अशा निवडणुका पाकिस्तानातही होत नसतील, आव्हाडांकडून आणखी एक व्हिडीओ शेअर